कोरोना पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी नागरिकांनी नदी किनारी किंवा कुठल्याही तलावाजवळ विसर्जनासाठी गर्दी करू नये, यासाठी शहरात मनपा आणि पोलिस प्रशासनाने विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. तसेच काही ठिकाणी महानगरपालिकेने बसची देखील केली आहे. सदरील ठिकाणी गणेश विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
याठिकाणी आहे कृत्रिम तलावआझाद नगर-
पारोळा चौफुली, महावितरण कंपनी कार्यालयाजवळ,गिंदोडिया चौक, गोल चौकी, प्रभाकर टाॅकीजसमोर, अरिहंत मंगल कार्यालयाजवळील टी पॉईटजवळ, कानुश्री मंगल कार्यालय, जुने धुळे परिसर, पवन नगर, दाता मंगल कार्यालयाजवळ, कॉटिन मार्केटबाजुला
चाळीसगावरोड पोलीस स्टेशन भाग
दसेरा मैदानजवळी पाण्याच्या टॉकीज जवळ, श्री राजेंद्र सुरी नगर बोर्डाजवळ,अग्रेसन चौक गरबा, मैदान मोकळ्या मैदानात, शंभर फुटीरोड पोलीस स्टेशन समोर
शहर पोलीस स्टेशन परिसर-
संगमा चौक,गाेळीबार टेकडीरोड, अजबे नगर,साक्रीरोड, जय मल्हार कॉलनी, लक्ष्मी नारायण लॉन्स जवळ, संभाप्पा कॉलनी, चितोड रोड, शाळा क्र.२८ चितोड नाका, फाशीपुल तसेच स्वराज्य जीमजवळ, शिवतीर्थ,साक्रीरोड समता नगर येथील पुलाच्या अलीकडे, गणपती मंदिर पुलाजवळ, अग्रवाल नगर, विश्राम भवन, अंजानशाह बाबा दर्गा जवळ,
पश्चिम देवपूर परिसर-
नकाणेरोड नवीन पुलाजवळ, स्टेडिअम जवळ, वलवाडी टी पॉईटजवळ
पुर्व देवपूर पोलीस स्टेशन परिसर-
हत्तीडोह, शासकीय तंत्र निकेतन कॉलेज, एस.एस.व्ही.पी.एस कॉलेज टी पॉईट, जी.टी.पी.स्टॉप, सावरकर पुतळा, पाुंझरा नदी किनारी तसेच नरडाणा चौफुली अशा ठिकाणी विसर्जणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोट
माझी बसुंधरा अभियानाच्या दृष्टीने आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ज्या गणेश मंडळांनी आणि आणि घरगुती गणपती पर्यावरण पूरक असतील अशा गणेश भक्तांनी विसर्जनाच्या ठिकाणी आपले नाव नोंदणी केली जाणार आहे.
आयुक्त देविदास टेकाळे