महापालिका : शहरात व्हॉल्व गळत्यांची दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 06:03 PM2019-05-07T18:03:33+5:302019-05-07T18:04:16+5:30

जुन्या इमारतीत पाण्याची नासाडी

Municipal Corporation: Demand for Valve Slit Repair in the City | महापालिका : शहरात व्हॉल्व गळत्यांची दुरुस्तीची मागणी

dhule

Next
ठळक मुद्देdhule


धुळे  : शहराला तापी योजना व अक्कलपाडा धरणातून पाणीपुरवठा होतो. यंदा दुष्काळाची स्थिती असल्याने अक्कलपाडा धरणातील पाण्याचा दिलासा आहे़ मात्र  शिल्लक जलसाठा कमी झाल्याने शहरात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे़ तर दुसरीकडे शहरासह  मनपाच्या जुन्या इमारतीच्या आवारातील नळगळतीव्दारे गळत्यांद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे़ 
शहराला अक्कलपाडा, नकाणे व तापी नदीवरील योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो़ मात्र यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने  धरणाच्या जलसाठ्यावर परिणाम झाला आहे़ त्यामुळे  उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे़ यासाठी मनपा प्रशासनाकडून त्या संदर्भात सुव्यवस्थित नियोजन करण्याची गरज आहे़ शहरातील बºयाच प्रभागातील पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनला लहान-मोठ्या प्रमाणात गळत्या लागल्या आहेत. तर काही  ठिकाणी गळत्या एवढ्या मोठ्या आहेत की तेथून पाणी मोठ्या प्रमाणात गटारीत वाहून जात आहे़  
साक्रीरोडवरी नेहरू पुतळ्याजवळ अनेक दिवसांपासून पाण्याची नासाडी होत आहे़ तर साक्रीरोडच्या रूंदीकरणाचे कामात देखील ठिकठिकाणी पाण्याची नासाडी झाली आहे़ त्यातील बहूसंख्य गळत्या अद्याप सुरूच आहेत.
 फाट्यावरील गळती सुरूच
राष्टÑीय महामार्गावरील बिलाडी फाट्यावरील व्हॉल्व्हला गळती लागली आहे़ त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ परिसरातील नागरिक गळतीव्दारे वाया जाणारे पाणी भरून नेतात. इतर वेळी मात्र पाणी वाहून जाते. गेल्या दोन महिन्यापासुन या ठिकाणाहून दिवस-रात्र पाण्याची नासाडी सुरु आहे़ मात्र अद्याप प्रशासनाकडून याबाबत कोणतेही उपाय-योजना केलेल्या दिसुन येत नाही़  येथील पाण्याचा उपयोग व्यवसायिकांसह नागरिकांना होतांना दिसून आला. तर गळतीद्वारे वाया जाणाºया पाण्याने परिसरात डबके साचत आहेत़ 


‘वॉटर मीटर’ आवश्यक
पाणीपुरवठयाच्या वेळी पाण्याची नासाडी केली जाते़ त्यामुळे मनपाला नुकसान सहन करावे लागते़ १३६ कोटी रूपयांच्या पाणी योजनेतून शहरात ५५ हजार वॉटर मीटर बसविणे आवश्यक होते़ पण योजनाच बंद असल्याने वॉटर मीटर देखील प्रलंबित आहे़ त्यामुळे वॉटर मीटर बसविणे आवश्यक आहे़
 

Web Title: Municipal Corporation: Demand for Valve Slit Repair in the City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे