शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात रिक्त पदांमध्ये उपनिरीक्षकांचा भरणा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:56 IST

जिल्हा पोलीस प्रशासन : गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान, शासनाकडे पाठपुरावा अपेक्षित

ठळक मुद्देपोलीस विभागात उपनिरीक्षक दर्जाची सर्वाधिक पदे रिक्त असल्याने स्वाभाविकच त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा इतरांवर येत आहे़ त्याचा परिणाम तपास कामावर होत आहे़ शासनदरबारी वारंवार मागणी नोंदविण्यात आली आहे़ पण त्याचा फारसा उपयोग होत नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे़ लवकरात लवकर रिक्त जागा भरल्या जातील, असे सांगण्यात येत आहे़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पोलीस प्रशासनातील रिक्त पदांबाबत वेळोवेळी चर्चा होत आली आहे़ रिक्त पदांचा ताण अन्य कर्मचारी आणि अधिकाºयांवर येत असल्याचे सर्वश्रृत आहे़ सद्यस्थितीत पोलीस उपनिरीक्षकांच्या ९० जागा मंजूर असताना मात्र केवळ ५५ अधिकारी कार्यरत आहेत़ परिणामी ३५ जागा या अद्यापही रिक्त असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे़  जिल्ह्यात सध्या १७ पोलीस ठाणे असून आणखी चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. जास्त लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाण हे निकष लावून हे प्रस्ताव पाठविले आहेत़ त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रिक्तपदाचा प्रश्न वेळीच सुटणे गरजेचे आहे़ धुळे शहराचा विस्तार वाढत असून कायदा सुव्यवस्थेच्या जबाबदारीतही वाढ होत आहे. त्यामुळे शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत दोन वर्षापूर्वीच गृह विभागाला प्रस्ताव दिला आहे. किमान शहरातील जी संवेदनशील ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत तरी निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी जिल्हा नियोजन विकास समितीकडे करण्यात आली आहे. विविध कारणांमुळे समाजात तणाव (सोशल टेन्शन) निर्माण होतो. ते जाणवले की ते कसे कमी करायचे, स्थिती हाताबाहेर गेली ती नियंत्रणात कशी आणायची, याचा पोलीस दलातर्फे सतत विचार सुरू असतो. त्यासाठी साम, दाम, दंड व भेद असे सर्व मार्ग अवलंबवावे लागतात. गुन्ह्यांच्या जगात डोकावले तर बहुतांश वेळा आरोपी तेच असतात. गुन्हे करणे हेच त्यांचे काम असते. तर या संदर्भात पोलीस अधिकाºयांनी वेळीच लक्ष देवून हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत़ अशा आरोपींवर परिणामकारक कारवाई करून त्यांच्यावर वचक कसा ठेवायचा, आणि त्यातून गुन्ह्यांचे प्रमाण कमी करायचे, यावर प्रामुख्याने अधिकाºयांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस