शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गतीमंद प्रज्वलला मिळाला ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 22:15 IST

बालकल्याण समिती । अमरावतीतून होता हरवला

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अमरावती येथील तेरा वर्षांचा गतीमंद मुलगा प्रज्वल हा दोन वर्षांपासून हरवला होता़ सायकल चालवत तो अमरावती रेल्वे स्टेशन वर आला़ त्याला रेल्वेचा मोह झाल्याने तो सहजपणे रेल्वेत बसला आणि थेट भुसावळला येउन पोहचला. २२ जुन २०१८ रोजी भुसावळ पोलिसांनी त्याला जळगाव बालकल्याण समितीकडे सोपविले़ त्यानंतर पुनर्वसनासाठी त्याला धुळे बालकल्याण समितीकडे पाठविण्यात आले़ धुळे बालकल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड़ अमित दुसाणे, प्रा. वैशाली पाटील, प्रा. सुदाम राठोड या सदस्यांनी त्याची काळजी आणि संरक्षणाची गरज पाहून शिरपूर येथील एन. झेड. मराठे गतीमंद बालगृहात त्याचा प्रवेश केला़दरम्यान, बालकल्याण समितीच्या आदेशानुसार बालगृहातील सहा मुलांना आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुंबईला पाठविण्यात आले. सुदैवाने प्रज्वलचे आधीच आधार कार्ड काढलेले होते़ त्यामुळे त्याच्या बोटांचे ठसे अपलोड करताच त्याचा आधार डाटा समोर आला आणि त्याचे नाव व पत्ता समितीच्या हाती लागला़ पालकांचा शोध घेणे सोपे झाले़ आधार कार्ड मुळे प्रज्वल अनिल तंतरपाळे या मुलाच्या पालकांपर्यंत पोहचण्यात बालकल्याण समितीला आणि शिरपूर येथील एन. झेड.मराठे मतीमंद मुलांचे बालगृहाला यश आले़ पालकांशी संपर्क करुन प्रज्वल सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली़ प्रज्वलची आई मंगला, वडील अनिल तंतरपाळे या दोघांना मुलाला कधी भेटु, कधी पाहु याची प्रचंड उत्सुकता लागली़ त्यांनी त्याच दिवशी शिरपूर गाठले़ मुलाची भेट झाली तेव्हा त्यांच्या आनंदाश्रूंचा बांध फुटला़ बालकल्याण समिती आणि शिरपूर बालगृहातील टीमचे आभार मानायला त्यांना शब्द सापडेना़ तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मुलाची भेट झाल्याने दोघांचे मन निशब्द झाले होते. हर्ष ओसंडून वाहत होता. मुलाची आणि आईवडीलांच्या मोठ्या विरहानंतर भेटीचा तो भावनीक क्षण पाहताना साऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले़ बालकल्याण समितीने कागदपत्रांचे सोपस्कार त्वरीत पूर्ण करुन प्रज्वलला त्याच्या आईवडीलांच्या स्वाधीन केले़ यावेळी अ‍ॅड़ अमित दुसाणे, प्रा. वैशाली पाटील, प्रा. सुदाम राठोड, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते पि. यु. पाटील, बालगृहाचे सचिव सुनिल मराठे, भगवान तलवारे, अधिक्षक प्रदिप पाटील, परेश पाटील उपस्थित होते़समितीचे आवाहनपालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड आवर्जुन काढावे़ कारण मुलगा हरवल्यास त्याच्या बोटाच्या ठशांवरुन आधार डाटा मिळवून पालकांशी संपर्क साधता येतो़ तसेच मुलगा किंवा मुलगी हरवली असेल तर राज्यातील बालगृहांमध्ये शोध घ्यावा़

टॅग्स :Dhuleधुळे