शेतकऱ्यांसाठी आमदार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 02:12 PM2020-01-31T14:12:41+5:302020-01-31T14:13:21+5:30

धुळ्यात मोर्चा : शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी

MLAs on the road for farmers | शेतकऱ्यांसाठी आमदार रस्त्यावर

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : पंतप्रधान पिक विमा योजनेचे शिरपूर तालुक्यातील १२ हजार ५४१ विमाधारक शेतकरी लाभार्थी आणि ४१० फळ पिक विमाधारक लाभार्थी शेतकºयांना तातडीने पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष के़डी़पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, भरत पाटील, जगन्नाथ महाजन, दर्यावसिंग जाधव, सुनील जैन, बोराडी येथील राजेंद्र पाटील, जगन पावरा, रमण पावरा, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, भुपेंद्रसिंह राजपूत, जयसिंग राजपूत, विजय पारधी, लाला गिरासे, आकाश मराठे, दीपक पावरा आदी उपस्थित होते.
शिरपूर तालुक्यातील पिकनिहाय बाधित शेतकरी संख्या १२ हजार ५४१ आहे. कापूस ६ हजार ८०१ शेतकरी, मूग २ हजार ३०५, मका१ हजार १२९, उडीद ८९७, ज्वारी ६३४, बाजरी २९१, सोयाबीन ४०४, भुईमूग ३१, तूर ३३, तीळ ३, कांदा १६ असे एकूण १२ हजार ५४१ शेतकरी बांधवांना तसेच फळ पिक बाधित शेतकरी बांधव ४१० आहेत. सर्व शेतकरी बांधवांना शासनाकडून तातडीने त्यांची पिक विमा रक्कम मिळावी यासाठी आमदार काशिराम पावरा यांच्या वतीने यापूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते़ दहा दिवसांच्या आत शेतकºयांना दिलासा न मिळाल्यास मोर्चा काढण्यात येईल असे देखील सूचित करण्यात आले होते़
शेतकºयांना कोणत्याही प्रकारचा दिलासा न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून तातडीने पिक विमा मिळावा यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करण्यात आला. इतर जिल्हा प्रमाणे धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकºयांना न्याय मिळावा, तातडीने नुकसान भरपाई, पिक विमा योजना लाभ तात्काळ द्यावा, कृषी विभाग व पिक विमा कंपनी यांची देखील चौकशी या निमित्ताने करावी अशी जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार काशिराम पावरा यांनी केली. योग्य ती मदत करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डी.गंगाधरन यांनी दिले.
गेल्या वर्षी ८ कोटी ६ लाख रुपयांचा फळ पिक विमा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झाला होता. यातील पहिल्या हप्ताचे ४़०३ कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झाले होते.
पंतप्रधान फळ पिक विमा योजना अंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना २०१८-१९ मध्ये आंबिया बहारसाठी लागू करण्यात येवून महाराष्ट्र शासनाच्यावतीने व अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लि. मार्फत गेल्या दीड महिन्यांपूर्वी फळ पिक विमा मंजूर करण्यात आला होता. या विक विमा योजनेतून केळी पिकाचे ४०३ लाभार्थी शेतकरी, पेरु पिकाचे १ व डाळींब पिकाचे ६ लाभार्थी असे एकूण ४१० लाभार्थी शेतकºयांना प्रत्येकी प्रति हेक्टर ६६ हजार रूपये प्रमाणे पिक विमा रकमेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला होता. ४ कोटी ३ लाख रुपये एवढी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झाली असून उर्वरीत दुसरा हप्ता ६६ हजाराचा मिळणे बाकी आहे. उर्वरीत रक्कम लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी देखील आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने ९ कोटी रुपये पिक विमा मिळाला होता़ यावर्षी मात्र पिक विमा मिळण्यात होणारी दिरंगाई शेतकºयांसाठी खूपच मारक ठरली आहे, असे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: MLAs on the road for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे