धुळे : युवतीसोबत फोटो काढून त्या जोडीचे पोस्टर तिच्या गल्लीत झळकावून बदनामी करण्यात आली. त्यामुळे कबीरगंज परिसरातील व्यथित युवतीने रविवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन जणांविरूद्ध चाळीसगाव रोड पोलिसात रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला आह़े या युवतीसोबत इंदूर येथील जुबेर हबीब मन्सुरी याने जोडीने फोटो काढला़ त्यानंतर त्याचे पोस्टर तयार केले आणि ते युवतीच्या गल्लीत तिच्या घराजवळच भिंतीला चिटकवण्याचा संतापजनक प्रकार केला. यासाठी जुबेरला अन्य एका इसमाने मदत केली़ याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े त्यावरून जुबेर मन्सुरीसह अन्य एकाविरुद्ध भादंवि कलम 306, 354, 511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
गल्लीत पोस्टर लावून युवतीची बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 01:33 IST