धुळे : जुने धुळे भागातील तरुणाला लग्न जमविताना मदत करणाºया एजंटसह जिच्याशी लग्न झाले त्या मुलीने भावाच्या मदतीने सव्वा लाखांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली़ दरम्यान, या प्रकरणी जळगाव, औरंगाबाद येथील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे़ मंगेश सोमनाथ पवार (२९) या तरुणाने ही तक्रार दाखल केली आहे़ २० जुलै २०१९ रोजी चोपडा येथील फुले नगरात राहणाºया पुनमचंद हिम्मत पाटील याच्याशी ओळख झाली़ लग्न जुळविण्यात एजंट म्हणून ते काम करीत असल्याने मंगेशला लग्न करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले़ शिवाय जालना येथील संगिता लक्ष्मण शिंदे या महिला एजंटशी देखील संपर्क करुन दिला़ या दोघांच्या माध्यमातून उषा श्यामराव मुळे (रा़ पंढरपूर रोड, पातोंडा ता़ जि़ औरंगाबाद) या मुलीशी मंगेशचा विवाह देखील झाला़ या तिघांसह उषाचा भाऊ संजय शामराव मुळे याने या लग्नापोटी मंगेशकडून १ लाख २० हजार रुपये घेतले़ तथापी, लग्नानंतर उषा ही मंगेशसोबत न राहता भाऊ संजय याच्यासह फरार झाली आहे़ त्यामुळे फसगत झाल्याची भावना मंगेश पवार याची झाली आहे़ त्याने या घटनेनंतर आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़ त्यानुसार, चोपड्याचा एजंट पुनमचंद पाटील, जालनाची एजंट संगिता शिंदे, पत्नी उषासह तिचा भाऊ संजय मुळे अशा चौघांविरुध्द संशयावरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला़ पुढील तपास सुरु आहे़
एजंटच्या माध्यमातून लग्न जुळविताना सव्वा लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:02 IST