मिल कामगाराचा मुलगा झळकणार मराठी पडद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:44 PM2020-01-19T22:44:47+5:302020-01-19T22:47:06+5:30

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क लहानपणापासून अभिनयाची आवड होती़ त्यामुळे शिक्षणासोबत छंद जोपासत गेलो़ एमबीए शिक्षण झाल्यानंतर पुण्यात ...

 The mill worker's son will be seen on the Marathi screen | मिल कामगाराचा मुलगा झळकणार मराठी पडद्यावर

Dhule

Next
ठळक मुद्देकुंटूबासोबत एकत्र पाहण्यायोग्य चित्रपटचित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीलारहस्याचा शोध घेणारा अनुभवाचा एक प्रवास..८० टक्के चित्रीकरण तोरणमाळ येथे

चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लहानपणापासून अभिनयाची आवड होती़ त्यामुळे शिक्षणासोबत छंद जोपासत गेलो़ एमबीए शिक्षण झाल्यानंतर पुण्यात चित्रपटात काम करण्यासाठी पहिल्यांदा आॅडिशन दिली़ त्यात माझी निवड झाल्याने मला रहस्य या चित्रपटात अभिनेत्याची भूमिका करण्याची संधी मिळाली़ एखाद्या गोष्टीची मनात जिद्द, चिकाटी व इच्छा शक्ती असेल तर काहीही शक्य करता येवू शकते़ असे मत अभिनेता लकी बडगुजर यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले़
प्रश्न : रहस्य या चित्रपटात टायटाय गाणे कोणी गायल आहे व काय सांगाल?
उत्तर: हिंदी गाण्याप्रमाणे मराठी चित्रपटातील गाण्यांना देखील मोठ्या प्रमाणात आजही पसंती आहे़ लवकरच राज्यातील १५० चित्रपट गृहात प्रदर्शित होणाऱ्या रहस्य चित्रपटाचे टायटल गाणे मराठी गाण्यांची ओढ असलेल्या सुप्रसिध्द गायिका सुनिधी चौहान यांनी गायले आहे़
प्रश्न : किती खर्चातून रहस्य हा चित्रपट पडद्यावर झळकणार आहे ?
उत्तर: नंदूरबार येथील भावेश पाटील हे चित्रपटाचे डायरेक्टर आहे. त्या यापूर्वी बळीराजा, नियत, गेमओव्हर, चाबुक अशा चार लघू चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता त्यांचा रहस्य हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे़ या चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण तोरणमाळ येथे झाले आहे़ त्यासाठी सुमारे १ कोटी ३० लाख रूपये खर्च आला आहे़
प्रश्न : यापूर्वी तुम्ही कोणत्या चित्रपटात अभिनय केले आहे ?
उत्तर: मॉडलिंग, फोटोग्राफी तसेच अभिनयाची आवड होती़ यापुर्वी शॉट फिल्म मध्ये अभिनय केले आहे़ मात्र पहिल्यांदाच रहस्य या मराठी चित्रपटात अभिनेत्याची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे़ या चित्रपटात इंटरटेनमेंट, हॉरर दृश्ये आहेत़ शिवाय कुंटूबासोबत एकत्र चित्रपट पाहण्या योग्य आहेत़
घडणाºया रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं दडलेलं रहस्य हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. या चित्रपटात खान्देशातील लकी बडगुजर, राकेश बागुल, स्वाती पाटील, ऋतुजा सोनार, स्वाती शुक्ला आदी कलाकार भूमिका साकारत आहेत़ तर या चित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची आहे.
रहस्याचा शोध घेणारा अनुभवाचा एक प्रवास...
प्रत्येक नवी रात्र ही रहस्याला जन्म देत असते. अशाच एका रहस्याचा शोध घेण्याच्या प्रवासाचा थरारक अनुभव देणारा भावेश प्रोडक्शन्सचा हा चित्रपट आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच चित्रपट प्रदर्शित होण्या आधी कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा पोस्टर अनावरण झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

Web Title:  The mill worker's son will be seen on the Marathi screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे