धुळे : येथील लळींग गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर नऊ मे रोजी सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघातातील जखमी स्थलांतरीत मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़लवकुश रमजश चौधरी (४५, रा़ जगजीवनपूर, जि़ सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे़ त्याच्या सोबत असलेला रामनिवास फुलराज प्रजापती (२६) याने दिलेल्या फिर्यादीवरुन दुचाकी चालक गोविंद राम सवारे चौधरी (२८) याच्याविरुध्द मोहाडी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४, (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास हवालदार दराडे करीत आहेत़रामनिवास प्रजापती याने दिलेल्या फियादीत म्हटले आहे की, २२ मार्चपासून देशात लॉकडाउन झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली़ यामुळे आम्ही सातार येथून आमच्या मुळ गावी वाशी उत्तरप्रदेश येथे जाण्यासाठी मोटारसायकलींवर निघालो़ गोविंद राम सवारे चौधरी याच्या मोटारसायकलीवर मयत लवकुश हा डबलशिट बसला होता़ मोटारसायकल भरधाव वेगात असल्याने गतीरोधकावर उदळून लवकूश खाली पडला़ त्यात त्याच्या डोक्याला मार लागला़ उपचारासाठी त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले होते़
स्थलांतरीत मजुराचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 12:25 IST