उत्तर - देशात कोरोना महामारीमुळे सर्वांना अडचणीला सामाेरे जावे लागत आहे. अशा काळात देशाची अर्थव्यवस्थादेखील धोक्यात आली आहे. कोरोनाला मुळासकट हरविण्याची, सर्वांनी एकमेकांना साथ देण्याची गरज आहे. तरच आपण कोरोनाला हरवू शकतो. सध्या जरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी भविष्यात कोरोनामुक्त शहर करण्यासाठी प्रशासनाला साथ देण्यात गरज आहे.
प्रश्न - महानगरात कोणत्या कामांना प्राधान्य देणार
उत्तर - कोरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव शहरात काम केले आहे. त्यामुळे तेथील कामांचा अनुभव धुळे शहरासाठी उपयोगात आणता येऊ शकतो. कोरोना हरविण्यासाठी प्रभागनिहाय कन्टेन्मेंट झोन तयार केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. यासाठी धुळेकर नागरिकांची येणाऱ्या काळात मदतीची गरज आहे.
प्रश्न - औषधी व ऑक्सिजन पुरवठ्यावर योग्य नियोजन करणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात सर्वत्र बाधितांची संख्या वाढली होती. त्यामुळे बाधितांना बेड मिळणेदेखील कठीण झाले होते. त्यामुळे अशा काळात औषधी व ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासली होती. येणाऱ्या काळात अशी पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी औषधी व ऑक्सिजन या दोन्ही बाबींवर लक्ष देऊन आरोग्याचे प्रश्न सोडविले जातील.
प्रश्न - धुळेकरांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार
उत्तर - मनपा प्रशासनाचे अधिकारी व नागरिकांच्या सहकार्यांने धुळेकरांचे प्रश्न साेडविण्यासाठी येणाऱ्या काळात प्राधान्य देण्यात येईल. कमी वेळेत जास्त कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल.