मिटरमुळे दररोज पाण्याची ६० लाखाची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:14 PM2020-07-11T17:14:42+5:302020-07-11T17:15:03+5:30

शिरपूरचा पाणीपुरवठा हायटेक : भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्ष घेऊन केले नियोजन

Meter saves Rs 60 lakh per day for water | मिटरमुळे दररोज पाण्याची ६० लाखाची बचत

dhule

Next


सुनील साळुंखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी या योजनेंतर्गत शिरपूर नगरपालिकेने सुमारे ३० कोटी ७७ लाख रूपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजना ४ वर्षापूर्वीच करून शहरवासियांना मिटरनुसार बील आकारण्यात येत आहे़ त्यामुळे तब्बल ६० लाखाची दररोज पाण्याची बचत होत असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली़
शहरातील रहिवाशांना दोन वेळेच्या मुबलक निजर्तंूक पाणी ऐवजी डिसेंबर २०१६ पासून ८ तास पिण्याचे पाणी दिले जात आहे़ विशेषत: विद्युत पुरवठा खंडीत झाला तरी जनरेटरद्वारे पाणी पुरवठा करण्याची सुविधा आहे़ या योजनेमुळे पाणी साठविण्याची आवश्यकता भासणार नसल्यामुळे डेंग्युसारखे आजार उद्भवणार नाहीत तसेच नेटवर्क प्रणालीद्वारे जलशुध्दीकरण केंद्र, रॉ वॉटर पंम्पींग स्टेशन व ७ जलकुंभचे नियंत्रण एकाच व्यक्तीवर केले जात आहे़
माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून व कल्पनेतून तालुक्यात जलसंवर्धनाचे काम केले जात आहे़ शहरातील नागरिकांना दरडोई दरदिवशी सुमारे १४० लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जात आहे़ सध्या २० लाख लिटर क्षमतेचे ६ तर एक १० लाख लिटर क्षमतेचे असे एकूण ७ जलकुंभ आहेत़ शहरात १३ हजार ५४० नळ कनेक्शन धारक आहेत़ २४ तास योजनेत मिटरद्वारे पाणी दिले जात आहे़ रेडीओ फ्रिक्वेन्सी थ्री जी ट्रान्समिटींग वॉटर मिटर हे प्रत्येक ग्राहकाच्या घरी लावले गेले आहे़ जेणेकरून आॅटोमॅटिक पद्धतीने कोणता ग्राहक किती पाणी वापरतो ते समजत आहे़ त्याची विगतवारी नपा कार्यालयात होत असते़ या सुविधेमुळे जेवढे पाणी वापरणार तेवढे बील प्राप्त होणार आहे़ त्यामुळे सध्या वापरात असलेल्या पाणीपट्टीच्या निम्मे सुद्धा बीले काहींना मिळत आहेत़
२४ तास पाण्याचा पुरवठा कसा, किती केला जात आहे हे पाहण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्रात कंट्रोल रूम असली तरी पुन्हा नगरपालिका प्रशासनाला जागेवरच नगरपालिका कार्यालयात पाहण्यासाठी विशेष कंट्रोल रूम बांधण्यात आली आहे़ बऱ्याच वर्षानंतर करवंद धरणासह करवंद जॅकवेल जवळचा साचलेला गाळ काढण्यात आल्यामुळे साठवण क्षमता वाढली आहे़ पुढील २० ते २५ वर्षांच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था माजी मंत्री पटेल यांनी आजच करून ठेवली आहे.

Web Title: Meter saves Rs 60 lakh per day for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.