शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

मेडलिस्ट गतीमंद गोेलूला अखेर मिळाले ‘मातृछत्र’, दोघेही गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:41 IST

बालकल्याण समितीचे कौतुकास्पद कार्य । जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत सोपविले

धुळे : बºयाचदा गतिमंदपणामुळे पालक आपल्या बालकांना सोडून देण्याची भूमिका घेतात़ अशावेळी अनाथालय या मुलांना सांभाळत असलेतरी अशा गतिमंदांमध्ये देखील प्रगल्भ शक्ती असते़ याच जोरावर गोळाफेकीत गोल्ड मेडल मिळविणाºया १९ वर्षीय गोलू कांबळे केवळ धुळ्यातील बालकल्याण समितीच्या प्रयत्नाने पुन्हा मातेचे छत्र लाभले़ जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोलूला त्याच्या मातेकडे सोपवितांना केवळ बालकल्याण समितीच्या पदाधिकाºयांनाच नाही तर उपस्थितांनाही गहिवरुन आले़  गोलू संजय कांबळे (१९) या मुलाला बालकल्याण समिती, पुणे यांच्या आदेशाने बालकल्याण समिती, धुळे यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आला होता़ त्याला शिरपूर येथील अनाथ गतिमंद मुलांच्या बालगृहात ठेवण्यात आले होते़ कै ़    बापूसाहेब एऩ झेड़ मराठे विधायक संस्था, थाळनेर यांच्या मार्फत हे अनाथगृह चालविले जाते़ २०१४ मध्ये संस्थेत दाखल झालेल्या गोलूच्या अंगी अदभूत शक्ती असल्याचे निदर्शनास आले़ संस्थाध्यक्ष भगवान तलवारे आणि सचिव सुनील मराठे यांनी गोलूची प्रतिभा ओळखली़ त्यानुसार त्याला हस्तकला, मुर्तीकाम, रंगकाम, स्क्रिन प्रिटींग या व्यवसाय शिक्षणाबरोबरच नियमित शालेय शिक्षण देखील दिले जात होते़ गोलूने दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेत गोळा फेक प्रकारात गोल्ड मेडेलही मिळविले आहे़ गोलूच्या परिवाराला शोधण्याची जबाबदारी सोपविलेल्यांनी औरंगाबाद जिल्ह्यासह सिल्लोड परिसरातही शोध घेतला होता़ कर्मचाºयांच्या या प्रामाणिक प्रयत्नाला अखेर यश आले़ गोलूच्या घरासह त्याची आई आणि मामाचा शोध लागला़ ही माहिती धुळ्यातील बालकल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड़ अमित दुसाने आणि अन्य सदस्यांना कळविण्यात आली़ कागदपत्रांची पुर्तता करुन गोलूला त्याची आई माधुरी संजय कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले़ गोलू याला त्याची आई माधुरी यांच्याकडे सोपविण्यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम देखील घेण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन, बालकल्याण समिती धुळेचे अध्यक्ष अ‍ॅड़ अमित दुसाने, सदस्य प्रा़ सुदाम राठोड, प्रा़ वैशाली पाटील, मिना भोसले यांच्यासह भगवान तलवारे, सुनील मराठे, समाजकल्याण अधिकारी भरत धिवरे, पी़ यू़ पाटील, महिला व बालविकास अधिकारी शिंपी, सुनील वाघ यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते़ सर्वांनाच गहिवरुन आले़ गोलूच्या खाणाखुणांद्वारे सुरु होता शोध गतिमंद असला तरी गोलू हा खाणाखुणा करुन त्याच्या घराचा परिसर तसेच तेथील मंदिर, शाळा, इमारत बाबत सांगण्याचा काहीतरी प्रयत्न करीत होता़ त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून गोलूच्या परिवारासह त्याच्या घराचा शोध घेण्याचे काम सुरु होते़ यासाठी ‘गुगल’ची देखील मदत घेण्यात आली़ संस्थेने धुळे येथील बालकल्याण समितीच्या परवानीने दोन कर्मचाºयांची स्वतंत्र नियुक्ती केली होती़ त्यांच्यावर परिवाराचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविली होती़ 

टॅग्स :Dhuleधुळे