नेर : कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू असल्याने नवसारी येथुन बºहाणपूरच्या दिशेने निघालेले १८ ते २० तरुणांना नेर शिवारात चौधरी बंधुसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवण दिले़ तर व्यापारी संजय कोळी यांनी युवकांना मोफत टरबुज वाटप केले़गुजरात राज्यातील नवसारी शहरातील खासगी बांधकाम व्यावसायिकाकडे काही तरुण मजुरी काम करत होते़ काम बंद असल्याने ते नवसारी येथुन जे वाहन मिळेल त्या वाहनाने नेरपर्यंत प्रवास करीत आले. नेरला सोमवारी दुपारी बारा वाजता नेर येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र देवरे, जितेंद्र कोळी, पवन कोळी, राकेश अहिरे, छोटु कोळी यांना सुरत नागपुर महामार्गावर पायी जात असतांना दिसले. त्यांची विचारपुस केल्यानंतर त्या युवकांनी सर्व माहिती सांगितली.संपुर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे़ हे युवक भयभीत दिसुन आले. खायायला अन्न नाही. रस्त्याने प्रत्येक जण संशयाने पाहत आहेत. आमच्याकडे पैसाही शिल्लक नव्हता. इकडुन तिकडुन थोडा फार उसनवारीने पैसा घेत पायी प्रवासाला निघालो युवकांकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने मास्क, सॅनेटायझर सुद्धा नव्हते़ येथील सरपंच शंकरराव खलाणे यांनी त्यांना मास्क व सॅनेटायझर उपलब्ध करून दिले़ दरम्यान, त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहन मिळेल का अशी विचारणाही केली परंतु कुठलेच वाहन न मिळाल्याने नेर येथुन हे युवक शेवटी पायी आपल्या गावाकडे रवाना झाले़
नवसारीहून निघालेल्या तरुणांना मिळाले जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 20:43 IST