शिरपूर : बसमध्ये चढत असतानाच चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविले असल्याची घटना शिरपूर येथील बसस्थानकात घडली़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कृष्णा राजाराम शेटे (५८, रा़ कृष्णा गॅरेज, मांडळ रोड, गुजराथी कॉम्प्लेक्स, शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, २९ आॅक्टोबर रोजी ६ वाजेच्या सुमारास त्यांची सून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांचे मंगळसुत्र लांबविले़ त्यात ५ हजार रुपयांच्या दोन वाट्या, ६ मणी आणि ५ हजाराच्या दोन वाट्या, ५ मणी असा १० हजाराचा ऐवज होता़ याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल झाला़
बसमध्ये चढताना मंगळसूत्र लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:42 IST