दोंडाईचा येथील बांधकाम प्रगतीत असलेल्या समाजमंगल कार्यालयात दोंडाईचा शहर तेली समाजाची सर्वसाधारण सभा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष पंकज चौधरी होते. बैठकीत अध्यक्षपदी महेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष पदी मधुसूदन चौधरी, उपाध्यक्षपदी- जगदीश चौधरी व लालचंद चौधरी, सचिवपदी ॲड. सचिन चौधरी, खजिनदारपदी प्रा. धनराज चौधरी यांची, तर सदस्यपदी सुरेश चौधरी, अमृत चौधरी, मुकुंदा चौधरी, अशोक चौधरी, नाना चौधरी, हेमंत चौधरी, भगवान चौधरी, दगडू चौधरी, विनोद चौधरी, भूषण चौधरी, हेमंत चौधरी, रामकृष्ण चौधरी यांची निवड करण्यात आली. तर दोंडाईचा शहर तेली समाज युवक अध्यक्षपदी भूषण चौधरी, उपाध्यक्षपदी संदीप चौधरी, सदस्यपदी आनंदा चौधरी, जगदीप चौधरी, संदीप चौधरी, अनिकेत चौधरी, हेमंत चौधरी, मनोज चौधरी, भूषण चौधरी, प्रमोद चौधरी, नीलेश चौधरी यांची निवड करण्यात आली. बैठकीत खान्देश तेली समाज तालुका अध्यक्ष रवींद्र चौधरी, तालुका तैलिक अध्यक्ष चिरंजीवी चौधरी, आदींचा सत्कार करण्यात आला. बैठकीस समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.
दोंडाईचा शहर तेली समाज अध्यक्षपदी महेंद्र चौधरी यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST