शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार येताच देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार"; पंतप्रधान मोदींचे मोठं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 15:48 IST

PM Narendra Modi : धुळ्यातल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार असल्याचे म्हटलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. धुळे येथे पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी पहिली जाहीर सभा घेतली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला. काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळला जात असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. मात्र यावेळी पंतप्रधान मोदींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या आश्वासनाची जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीचे सरकार येताच देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्ष महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाआघाडीच्या वाहनाला ना चाकं आहेत ना ब्रेक आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसला कधीच माफ करणार नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यासोबत पालघरमधील वाढवण बंदराचा उल्लेख होताच पंतप्रधान मोदी यांनी आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटलं आहे.

"राज्यात इलेक्ट्रॉनिक वाहन प्रकल्प, पोलाद प्रकल्प, हरित प्रकल्प यासारखे प्रकल्प विविध भागात स्थापन झाले आहेत. महाराष्ट्राचा विस्तारही थांबतो. भारतातील सगळ्यात मोठं बंदर महाराष्ट्रात बनत आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी मी आलो होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एक इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, तुम्ही इतकं सगळं करत आहात आणि तिथे विमानतळही बांधा. त्या दिवशी मी शांत बसलो होतो. पण जशी आचारसंहिता संपेल आणि महायुतीच्या सरकारचा शपथविधी होईल मी महाराष्ट्र सरकारसोबत बसून देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण कशी होईल याच्यासाठी काम करेल," असे आश्वासन मोदींनी दिले.

देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार

"जगातील ‘टॉप टेन’मध्ये गणल्या जाणार्‍या पालघरच्या वाढवण बंदराचे भूमिपूजन झाले, तेव्हा मी तेथे नवीन विमानतळाची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण करण्याचे अत्यंत सुस्पष्ट आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात दिले. पालघरमधील या नवीन विमानतळामुळे मुंबई, एमएमआर आणि एकूणच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिशय मनापासून आभारी आहे," असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस