लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती घराघरात दिवे व ध्वज उभारून साजरी करण्यात आली़ कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक जयंती न करता महिलांनी पुढाकार घेवून घरातच जयंती साजरी केली़अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष जसपालसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाने जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते़ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फिजीकल डिस्टन्सिंग आणि प्रशासनाच्या नियमाचे पालन करून दत्त कॉलनीत घराघरात महिलांनी ध्वज आणि दिवे लावून साजरी केली. सोनम ठाकूर, हर्षदा येवले, ममता पाटील, धनश्री येवले, पूजा राजपूत, रेखा राजपुत आदींनी पुढाकार घेतला होता़ दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम झाला़ नायब तहसीलदार एस. एम. जोशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी लिपिक दीपक राजपूत यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
महाराणा प्रताप यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:40 IST