शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बस ट्रकवर आदळली सुदैवाने जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 22:46 IST

गरताडबारीनजिक अपघात : १४ प्रवासी जखमींवर उपचार, तत्काळ आर्थिक मदत

धुळे : परभणीच्या दिशेने जाणारी महामंडळाची एसटी बस पुढील ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात  १४ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ अपघाताची ही घटना शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली़ एमएच २० बीएल ३९१७ क्रमांकाची व अमळनेर येथून परभणीकडे जाणारी बस धुळे बसस्थानकातून सकाळी ८ वाजेच्या सुमारास पुढे मार्गस्थ झाली़ चाळीसगाव मार्गावर गरताड बारीजवळ असताना बसच्या पुढे जाणाºया ट्रकने अचानक ब्रेक दाबला़ परिणामी भरधाव जाणाºया बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले़ त्यामुळे बस जाऊन ट्रकच्या मागच्या बाजूस जोरात आदळली. सकाळची वेळ असल्यामुळे काही प्रवासी झोपेत होते़ अचानक अपघात झाल्यामुळे १४ प्रवाशांना दुखापत झाली़जखमींमध्ये, एकनाथ सिताराम वाणी, यमुनाबाई रविंद्र पवार (५५),  सुनील तुळशीराम माळी (४०), नंदा सुनील वाणी (३०), नवल सोनू चौधरी (७८), नयन रमेश पाटील (१३), सार्थ रमेश पाटील (१०), शंकुतला वसंत पाटील (५५), योगिता रमेश पाटील (३१), आदित्य रविंद्र ठाकूर (०९), आशाबाई अधिकार चौधरी (३५), प्रमिला प्रेमराज महाजन (५६), अनिता अनिल वाडीले (३५), सुमीत अमोल वाडीले (१५) यांचा समावेश आहे़ अपघाताच्या घटनेनंतर त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ या अपघातात गंभीर जखमी कोणीही झालेला नाही़ अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या धुळे विभागीय वाहतूक अधिकारी किशोर महाजन, धुळे आगारप्रमुख भगवान जगनोर, वाहतूक निरीक्षक घनश्याम बागुल, धुळे विभागाचे कार्यशाळा अधीक्षक हर्षल गोसावी या अधिकाºयांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ जखमींना रुग्णालयात पाठविल्यानंतर त्यांना तातडीची ५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात