भगवान परशुराम यांची जयंती घरोघरी साजरी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:38 AM2021-05-08T04:38:09+5:302021-05-08T04:38:09+5:30

धुळे- ब्राह्मण समाजाचे आराध्यदैवत असलेल्या भगवान परशुराम यांची जयंती माेठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. त्यानिमित्त माेटारसायकल रॅली, शाेभायात्रा व ...

Lord Parashuram's birthday will be celebrated from house to house | भगवान परशुराम यांची जयंती घरोघरी साजरी होणार

भगवान परशुराम यांची जयंती घरोघरी साजरी होणार

Next

धुळे- ब्राह्मण समाजाचे आराध्यदैवत असलेल्या भगवान परशुराम यांची

जयंती माेठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. त्यानिमित्त माेटारसायकल

रॅली, शाेभायात्रा व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा १४ मे

राेजी भगवान परशुराम जयंती आहे. मात्र, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शहरात

यंदा सार्वजनिक कार्यक्रम हाेणार नाही. मात्र, आगळ्यावेगळ्या पद्धतीने

यंदा परशुराम जयंती शहरातील सर्व ब्राह्मणांकडून एकाच वेळी भगवान परशुराम

यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात येणार असल्याची माहिती

यज्ञाेपवितचे अनिल दीक्षित यांनी दिली.

सार्वजनिक स्वरूपात जरी भगवान परशुराम जयंती साजरी करता येणार नसली, तरी घरात तर साजरी करता येऊ शकत असल्याने एकाच वेळी प्रतिमापूजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार

आहे. त्यानुसार, १४ मे राेजी प्रत्येक ब्राह्मणाने घरी एकाच वेळी

प्रतिमेचे पूजन करावयाचे आहे. तेही ऑनलाइन पद्धतीने आपल्या

माेबाइलद्वारे सकाळी ठीक ८ वाजता प्रतिमापूजनाचा कार्यक्रम हाेईल.

ज्यांच्याकडे भगवान परशुराम यांची प्रतिमा नसेल, त्यांना ती यज्ञाेपवित

संघटनेतर्फे माेफत दिली जाणार आहे. त्यासाठी अट एकच, प्रतिमापूजनाचा फाेटाे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर संबंधितांना

पाठवावा लागणार आहेे. प्रतिमापूजन करणाऱ्या प्रत्येक समाजबांधवाला यज्ञाेपवितचे

अध्यक्ष अनिल दीक्षित यांच्याकडून माेफत मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

प्रतिमेसाठी अनिल दीक्षित (ग.नं.४, मरीमाता मंदिरासमाेर, ऊसगल्ली), रमेश

कुळकर्णी (अलंकार साेसायटी, ३१ अरिहंत मंगल कार्यालयामागे, स्वप्नील

कुळकर्णी (जिजामाता हायस्कूलसमाेर) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन

करण्यात आले आहे.

Web Title: Lord Parashuram's birthday will be celebrated from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.