शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भगवान धनगरला म्हसावद येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 13:16 IST

दुहेरी खून प्रकरण : आठवा संशयित

ठळक मुद्देधुळ्यातील दुहेरी खून प्रकरणसात जण पोलिसांच्या जाळ्याततपास कामाला प्राप्त होते गती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील बाप-मुलाच्या दुहेरी खून प्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे़ शहादा तालुक्यातील म्हसावद येथून भगवान धनगर या संशयिताला पश्चिम देवपूर पोलिसांच्या शोध पथकाने सोमवारी सकाळी ताब्यात घेतले़ त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील भगवान धनगर हा आठवा संशयित आरोपी आहे़ देवपुरातील सरस्वती कॉलनीतील रावसाहेब पाटील (५४) आणि त्यांचा मुलगा वैभव (२१) यांच्या हत्येप्रकरणी ८ जणांविरुध्द संशयावरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला आला आहे़ तपासाची चक्रे फिरवित पश्चिम देवपूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन ८ संशयितांपैकी ६ जणांना अटक केली.  त्यात, बाजीराव उर्फ सुभाष सजन पवार, हर्षल उर्फ दादू रवींद्र पाटील, जयराज पाटील, भुपेश उर्फ भुपेंद्र वाल्मिक पाटील या चौघांना पोलिसांनी रात्रीतून अटक केली होती़ तर जळगाव येथून ऋषिकेश पाटील आणि वैभव उर्फ सोनू पवार यांना ताब्यात घेतले होते़ सध्या या सहा जणांची रवानगी पोलीस कोठडीत आहे़ त्यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपत असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे़ तर आरोपींना पळून जाण्यासाठी कारची मदत करणारा संशयित दर्शन परदेशी याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणाचा तपास गतीने सुरु आहे़ पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक सरिता भांड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने शहादा तालुक्यातील म्हसावद येथे सोमवारी सकाळी अचानक छापा टाकला आणि भगवान धनगर या संशयिताला ताब्यात घेतले आहे़ त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील तो आठवा आरोपी आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा