शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

लॉकडाउनमध्ये कष्टकऱ्यांना ‘शिवभोजन’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 22:33 IST

पाच रुपयात जेवण : अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्णांसह नातेवाईकांची झाली सोय, वस्त्यांनाही लाभ

धुळे : कोरोना लॉकडाउनच्या काळात शासनाची शिवभोजन योजना गरजूंसाठी खºया अर्थाने आधार ठरली आहे़संचारबंदीमुळे लहानमोठे सर्व हॉटेल्स बंद असताना सर्वसामान्यांची जेवणाची गैरसोय होवू नये यासाठी शिवभोजन केंद्र सुरूच ठेवण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतल्याने अनेकांची उपासमार टळली आहे़ विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात शिवभोजन थाळीचा दर दहा रुपयांवरुन पाच रुपयांवर आणल्याने हातावर पोट असणाºया कष्टकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़शासनाने शिवभोजन योजना सुरू केली त्यावेळी धुळे शहरात केवळ बाजार समिती आणि बस स्थानक अशा दोन ठिकाणी केंद्र सुरू केले होते़ त्यावेळी ७५ थाळ्यांची मर्यादा होती़ परंतु आता लॉकडाउनमध्ये गरजूंची गैरसोय होवू नये यासाठी शंभर थाळ्यांची परवानगी दिली आहे़ तसेच प्रशासनाने नव्याने तीन केंद्र सुरू केले आहेत़ त्यात देवपूर बस स्थानक येथे देविदास लोणारी, कमलाबाई शाळेसमोर संदीप चव्हाण यांना शिवभोजन केंद्राची परवानगी मिळाली आहे. तर जिल्हा न्यायालयात देखील शिवभोजन केंद्र सुरू झाले आहे़ त्यामुळे धुळे शहरात शिवभोजन केंद्रांची संख्या आता पाच झाली आहे़ विशेष म्हणजे या पाचही केंद्रांच्या परिसरात हातावर पोट असणाºया कष्टकºयांची वसाहत असून तात्पुरत्या झोपडीत राहणाºया निराधार कुटूंबांची संख्या देखील मोठी आहे़ या सर्वांची सोय या केंद्रांमध्ये झाली आहे़ याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सफाई कामगार यांचाही भोजनाचा प्रश्न सुटला आहे़ घरी जाण्यापेक्षा अनेक कर्मचारी शिवभोजन केंद्रातून पार्सल घेवून वेळ मिळेल तेव्हा भोजन करताना दिसत आहेत़ शिवभोजन केंद्रांवर भोजन तयार करण्याआधी स्वच्छता पाळली जात असून पार्सल देताना देखील सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा राखण्यात येत आहे़कोरोना विषाणू प्रादुभार्वामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आदी नागरिकांचे जेवण अभावी हाल-अपेष्टा होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने निर्देश दिले आहेत की, शिवभोजनाच्या प्रती थाळीसाठी लाभधारकाकडून पाच रुपये इतकी आकारणी करावी. याबाबत वाढीव अनुदान यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पुढील तीन महिन्यांपर्यंत याच दराने शिवभोजन थाळीचा दर असेल, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिले आहेत.गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन २६ जानेवारी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाउन घोषित झाले आहे. त्यामुळे शिवभोजन उपलब्ध करुन देणारी भोजनालये बंद करण्यात आली होती़ परंतु २८ मार्च पासून शिवभोजन केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले़ भोजनालयातून व्यावसायिक कारणासाठी जेवण उपलब्ध करुन दिल्यास दंडात्मक स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. शिवभोजन केंद्र चालकांनी ग्राहकांना शक्यतो आवेष्टित स्वरुपात भोजन उपलब्ध करुन द्यावे. शिवभोजन तयार करण्याआधी संबंधितांनी किमान २० सेकंद हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिवभोजन केंद्र चालकांनी सर्व भांडी निर्जतूंक करावीत, शिवभोजन तयार करणाºया कर्मचाºयांनी साबणाने वारंवार हात धुवावेत, सर्वांनी मास्कचा वापर करावा तसेच प्रत्येक ग्राहकात किमान एक मिटर अंतर राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे