शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील चांदतारा चौकातून १९ जनावरांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:28 IST

कत्तलीचा प्रयत्न : एलसीबी आणि आझादनगर पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देआझादनगर भागातील चांदतारा चौक येथील घटनाकत्तलीसाठी अवैधरित्या डांबून ठेवलेल्या १९ जनावरांची सुटकास्थानिक गुन्हे शाखा आणि आझादनगर पोलिसांची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील आझादनगर भागातील चांदतारा चौक येथे कत्तलीसाठी अवैधरित्या डांबून ठेवलेल्या १९ जनावरांची सुटका करण्यात आली़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी केली़ याप्रकरणी संशयित साबीर अकबर शेख (रा़ चांदतारा चौक, धुळे) या संशयिताविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील आझादनगर भागातील चांदतारा चौकात छापा टाकला़ त्याठिकाणी असलेल्या एका पत्रटी शेडमध्ये पथकाने तपासणी केली़ यावेळी त्या ठिकाणी दाटीवाटीने बांधून ठेवलेली १९ जनावरे मिळून आली़ त्यांची त्याचक्षणी सुटका करण्यात आली़ ही जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचा संशय पोलिसांना आल्याने कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी विशाल पाटील यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयित साबीर अकबर शेख याच्या विरोधात आझादनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला़ पुढील तपास सुरु आहेत़ परिसरात या घटनेची दिवसभर चर्चा सुरु होती़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, आझादनगर पोलीस स्टेशनचे शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पोलीस उपनिरीक्षक नागलोत, हेड कॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, पोलीस कर्मचारी मायुस सोनवणे, मनोज पाटील, तुषार पारधी, चेतन कंखरे, विशाल पाटील, गुलाब पाटील, महेश मोरे, भोई असे स्थानिक गुन्हे शाखा आणि आझादनगर पोलीस अशा संयुक्त विद्यमानाने ही कारवाई करण्यात आली़ ८६ हजार रुपये किंमतीची १९ जनावरे ताब्यात घेण्यात आली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा