धुळे : येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या वसाहतीमागील जंगलात दोन बिबटे आढळून आले आहेत़ त्यांना हुसकाविण्याचा प्रयत्न केला असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देखील याची माहिती दिली आहे. जवानांसह त्यांच्या परिवाराला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती समादेशक संजय पाटील यांनी दिली़सुरत-नागपूर महामार्गावर धुळे शहरानजिक राज्य राखीव पोलीस दलाची वसाहत आणि कार्यालय आहे़ याच्या पाठीमागील भागात जंगल आहे़ जंगल असल्यामुळे जंगली श्वापदांचा धोका मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असल्याचे समोर आले आहे़बिबट्याचे झाले दर्शनराज्य राखीव पोलीस दल आणि त्याच्या लगतच असलेल्या मातोश्री वृध्दाश्रम या दरम्यान तीन दिवसांपुर्वी जवानांना बिबट्या आढळून आला. तोच बिबट्या वृध्दाश्रमातील कर्मचाºयासह एका धनगर नामक व्यक्तीला सुध्दा दिसल्याचे सांगण्यात आले. जवानांना बिबट्या दिसल्यामुळे त्याची माहिती सहायक संजय पाटील आणि सहायक समादेशक सदाशिव पाटील यांना कळविण्यात आली़ ज्या दिशेने बिबट्या दिसला त्या दिशेला सतर्क राहण्याच्या सूचना जवानांना देण्यात आल्या होत्या़ परिणामी जवानाची एक तुकडी सज्ज करण्यात आली होती़वसाहतीत फोडले फटाकेतीन दिवसांपुर्वी दिसलेल्या बिबट्याचे दर्शन शनिवारी दुपारी पुन्हा जवानांना झाले. दूरवर असलेल्या बिबट्याचे छायाचित्र मोबाईलवर घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता़ मात्र क्षणार्धात बिबट्या दिसेनासा झाला़ बिबट्याला हुसकाविण्यासाठी या वसाहतीच्या परिसरात रात्री फटाके देखील फोडण्यात आले होते़वन अधिकारी दाखलघटनेचे गांभिर्य ओळखून तातडीने वन विभागाला बिबट्या असल्याची माहिती कळविण्यात आली होती़ त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्या संपूर्ण भागाची पाहणी केली़ बिबट्याच्या पायांचे ठसे दिसून आले आहेत़ पण, बिबट्या हा एकाच जागी राहू शकत नाही़ तो इथून गेलाही असेल असे वन विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे असल्याचे समादेशक पाटील यांनी सांगितले़सतर्कतेचे आवाहनराज्य राखीव पोलीस दलाच्या वसाहतीच्या मागील बाजूस जंगलात बिबट्या दिसल्याने त्याच्यापासून सावध रहावे़ कोणीही घराबाहेर पडू नये़ अनावश्यक फिरु नये असे आवाहन पोलीस व्हॅनच्या माध्यमातून माईकद्वारे वसाहतीच्या परिसरात करण्यात आले़
एसआरपीएफच्या परिसरात बिबट्याचे दर्शन जवानांसह परिवाराला ‘सतर्कतेचे’ आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 20:54 IST