शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

शिरपुरात स्वच्छता मोहिमेस सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:35 IST

शिरपूर : डेंग्यूसह अन्य आजारांच्या संदर्भात घरोघरी जाऊन तपासणी

शिरपूर : माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने गेल्या ३५ वर्षांपासून शहरात सातत्याने विकासाची कामे झाली आहेत. सर्वांच्या सोयीकरीता अत्याधुनिक हॉस्पिटल लवकरच सुरु करत आहोत. विकासकामांसाठी शासनाच्या निधीची आवश्यक असते, त्यादृष्टीने प्रयत्नशील आहोत. यापुढे कोणतीही समस्या राहणार नाही असे प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी मार्गदर्शन करतांना केले़लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष पटेल यांच्या संकल्पनेतून प्रभाग नं. २ मधील संत सेना नगर, करवंद रोडजवळ आर.सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या पाठीमागे माजी नगरसेवक नाटुसिंग गिरासे यांच्या घराजवळ विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेविका रंजनाबाई सोनवणे, मुख्याधिकारी अमोल बागुल, माजी नगरसेवक नाटूसिंग गिरासे, मनोहर पाटील, भटू माळी, अमोल पाटील, राजेश सोनवणे, उल्हास अग्रवाल, भाऊसाहेब सोनवणे, जयवंत माळी, जगदीश बारी, बाळू पाटील, जय गणेश सोनार, प्रकाश वाघ, भरत बारी, अनिल सोनार, चंदू पाटील, ब्रिजेश थोरात, ज्ञानेश्वर बोरगावकर, आनंद बारी, प्रकाश पाटील, जगन्नाथ माळी, दिनेश बोरसे, प्रवीण बोरसे, राकेश सैंदाणे, राजेंद्र जाधव, अमोल ठाकरे, कमलाकर वाघ, सिद्धेश बोरगावकर, पंकज सैंदाणे, योगेश वाघ, नथ्थू पाटील, सुनील जैन, नगरपालिकेचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपनगराध्यक्ष भूूपेशभाई पटेल म्हणाले, शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून सर्वांनी हातभार लावावा. शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यमय राहण्यासाठी नगरपालिकेला सर्वांनी सहकार्य करावे. यापुढे आवश्यक तेवढा पाणी पुरवठा नियमित होणारच आहे. पाणीपट्टी योग्य राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत़ विशेष स्वच्छता मोहिमेत संपूर्ण शहराची मोठया प्रमाणात साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे. डेंग्यू व इतर आजारांच्या बाबतीत घराघरात जावून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी स्वच्छतेबाबत व आरोग्याबाबत जागृत राहून नगरपालिकेला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले़ मुख्याधिकारी अमोल बागुल म्हणाले, स्वच्छता बाबत सर्व पूर्तता नगरपालिकेकडून सुरु आहे. डेंग्यू बाबत सर्वांनी काळजी घ्यावी. घरात सुद्धा त्याची उत्पत्ती होते, घरातील सर्वांची जबाबदारी आहे काळजी घेण्याची. घरात फ्रीजमध्ये अळ्या व टेरेसवर स्वच्छता पाहावे. पावसाचे पाणी टेरेसवर कुठे तरी साचलेले असते. आठवड्यातून एकदा सर्वांनी कोरडा दिवस पाळायचा आहे. नगरपालिका आपले काम करेल, पण प्रत्येक नागरिकाने देखील हातभार लावावा असेही ते म्हणालेत़ सूत्रसंचालन योगेंद्र गिरासे यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे