अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:57 PM2017-07-26T23:57:20+5:302017-07-27T00:00:27+5:30

दोंडाईचा : शहरातील महादेवपुरा परिसरातील अंगणवाडी क्रमांक १६० मध्ये लहान मुलांना देण्यात येणाºया पोषण आहारातील वाटाण्यांमध्ये अळ्या आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकाराची शिवसेनेतर्फे दखल घेण्यात आली़ 

Larvae in the nutrition of anganwadi | अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या

अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या

Next
ठळक मुद्दे वाटाण्यांमध्ये किडे व अळ्यापोषण आहारात केवळ वाटाणेच

लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : शहरातील महादेवपुरा परिसरातील अंगणवाडी क्रमांक १६० मध्ये लहान मुलांना देण्यात येणाºया पोषण आहारातील वाटाण्यांमध्ये अळ्या आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकाराची शिवसेनेतर्फे दखल घेण्यात आली़ 
नगरपालिकेच्या अंगणवाडीत पोषण आहार वाटप करण्यासाठी आणण्यात आलेल्या वाटाण्यांमध्ये धनोर नामक किडे व अळ्या आढळून आल्या़ याबाबत परिसरातील नागरिकांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे कळविल्यानंतर त्यांनी स्वत: येऊन पोषण आहाराची पाहणी केली़ सदर पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला नाही़  अंगणवाडी सेविका बी.एस.गुरव व मदतनीस हिराबाई मराठे यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता हा पोषण आहार मातोश्री महिला मंडळ बचत गट, धुळे येथून येत असल्याचे समोर आले़ अन्य पाच अंगणवाड्यांनाही असाच पोषण आहार पुरविण्यात आला आहे़ दर दिवशी अंगणवाडीच्या मेनू कार्ड प्रमाणे पोषण आहार देणे बंधनकारक असताना केवळ वाटाणेच देण्यात येत असल्याचेही समोर आले़ स्थानिक महिला बचत गटांनी पोषण आहार देण्याची तयारी दर्शविली असूनही दोंडाईचा नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करते़ अंगणवाडीला महिन्यातून दहाच दिवस पोषण आहार दिला जात असून सदोष पोषण आहार विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.  त्यामुळे या प्रकाराची चौकशी होणे आवश्यक आहे़

Web Title: Larvae in the nutrition of anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.