लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील कुसुंबा येथील स्टेट बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला़ पण, तो अयशस्वी झाल्याने दरोडेखोर पसार झाले़ सीसीटीव्ही वरुन दोन संशयितांना धुळे तालुका पोलिसांनी जेरबंद केले़ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे स्टेट बँकेची शाखा आहे़ सोमवारी सर्व दैनंदिन व्यवहार पूर्ण केल्यानंतर नेहमीप्रमाणे बँक बंद करण्यात आली़ मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूने काही दरोडेखोर आतमध्ये शिरले़ त्यांनी बँकेच्या मुख्य तिजोरीपर्यंत पोहचले़ पण, वेळीच सायरन वाजल्याने घाबरलेले दरोडेखोर तेथून पसार झाले़ घटनेची माहिती धुळे तालुका पोलिसांना देण्यात आली़ माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे आणि पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी सुरुवातीला पाहणी केली़ सीसीटीव्हीचे फुटेज आणि काही पुराव्यांच्या आधारे दरोडेखोरांपर्यंत पोहचले़ याप्रकरणी दोन संशयितांना तातडीने जेरबंद करण्यात आले़ घटनेचा पुढील तपास सुरु आहे़
कुसुंब्यातील बँकेत दरोड्याचा प्रयत्न, दोन संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:38 IST
धुळे तालुका पोलीस : सीसीटीव्हीची मिळाली मदत
कुसुंब्यातील बँकेत दरोड्याचा प्रयत्न, दोन संशयित ताब्यात
ठळक मुद्देस्टेट बँकेची कुसुंबा शाखा फोडण्याचा प्रयत्नधुळे तालुका पोलिस निरीक्षकांनी पकडले दोन दरोडेखोरतपास कामासह गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु