आॅनलाइन लोकमतधुळे : महसूल विभाग प्रशासनाचा कणा आहे. जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना संगणकाचे पुरेसे ज्ञान मिळून परिपूर्ण प्रशिक्षणासाठी नॉलेज सेंटर कार्यान्वित करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी केले.महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, भागवत डोईफोडे, सुरेखा चव्हाण, प्रमोद भामरे आदी उपस्थित होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध कामे करावी लागतात.त्यांना या कामांची माहिती व्हावी म्हणून नॉलेज सेंटर कार्यान्वित करण्यात येईल. या सेंटरमध्ये तलाठ्यापासून ते उपजिल्ह ाधिकाºयांपर्यंतच्या अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यात येईल.त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल. त्यामुळे कामकाजात सुलभता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले. अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे, तहसीलदार सुदाम महाजन, मनोहर पाटील मनोगत व्यक्त केले. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी आभार मानले. केले. तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी प्रस्तावणा व सूत्रसंचालन केले.
प्रशिक्षणासाठी नॉलेज सेंटर कार्यान्वित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:33 IST