चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:38 PM2019-12-16T22:38:24+5:302019-12-16T22:38:50+5:30

मोराणे ते गोंदूर मार्ग : १ लाख २५ हजाराची होती रोकड

The knife knife robbed the merchant | चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले

चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले

Next

धुळे : सरवड गावानजिक ट्रकचालकाला लुटल्याची घटना ताजी असतानाच व्यापाºयाला चाकूसारख्या शस्त्राचा धाक दाखविण्यात आला़ त्यांच्याकडील १ लाख २५ हजाराची रोकड घेऊन दोघांनी पोबारा केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी मध्यरात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
देवपुरातील वाडीभोकर रोडवरील नेहरु नगरात राहणारे नंदकिशोर वेडू सोनवणे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, सोनवणे यांचे होलसेल किराणा दुकान आहे़ होलसेल दुकान असल्यामुळे किराणा मालाचे उधारीचे १ लाख २५ हजार रुपये गोळा करुन एमएच १८ एआर ९९८७ क्रमांकाच्या दुचाकीने येत होते़ साक्री रोडवरील मोराणे गावाच्या पुढे गोंदूर फाट्याजवळ दोन जणांनी त्यांची दुचाकी अडविली़ यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हते़ अंधाराचा फायदा दोघांनी उचलला़ लूटीच्या तयारीत असलेल्या त्या दोघांनी त्यांचे चेहरे झाकलेले होते़ त्यांनी चाकूसारख्या हत्याराचा धाक दाखवून झटापट करण्यास सुरुवात केली़ सोनवणे यांच्याकडे असलेली बॅग हिसकावून घेतली़ त्यानंतर सोनवणे यांना मारहाण करुन दुचाकीवरुन पळून गेले़ १ लाख २५ हजाराची रोकड त्यांनी लांबविली़ जबरी लुटीची ही घटना रविवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली़ भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या सोनवणे यांनी थेट धुळे तालुका पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली़
लुटीच्या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलीस निरीक्षक आऱ एस़ काळे, पोलीस उपनिरीक्षक के़ पी़ चौधरी, जे़ एऩ गोटे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली़ घटनास्थळाचा पंचनामा करुन लूट करणाºया दोघांचा शोध घेतला जात आहे़
याप्रकरणी नंदकिशोर सोनवणे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़
दरम्यान, सरवड गावाजवळ ट्रकचा पाठलाग दोघांनी केला़ ट्रक थांबवून चालकाला मारहाण करण्यात आली होती़ ही घटना ताजी असतानाच पुन्हा दोन जणांनी गोंदूर फाट्यावर लूट केल्याचे समोर आले आहे़ घरफोडीचे सत्र संपले असतानाच आता जबरी लुटसारख्या घटना घडत असल्यामुळे अशा लूट करणाऱ्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिलेले आहे़

Web Title: The knife knife robbed the merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.