शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

पाणीप्रश्नी धुळे महापालिकेत काथ्याकूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 6:27 PM

बैठक : महापौरांच्या दालनात अभियंत्यांवर आगपाखड, वेळेवर पाणी देण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पाणी पुरवठा अभियंत्यांमुळे धुळेकरांच्या घशाला कोरड पडली आहे़ नियोजनशुन्य कारभारामुळे धुळेकर पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप महापौर चंद्रकांत सोनार यांनी बैठकीत केला़ पाणी वितरणात नियोजनाचा अभाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी पाणी प्रश्नावर आपल्या दालनात तातडीची बैठक बोलाविली़ यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, विरोधी पक्षनेते साबीर शेख, आयुक्त सुधाकर देशमुख, महिला सभापती निशा पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, अभियंता कैलास शिंदे, नगरसेवक नागसेन बोरसे, सुनील बैसाणे, संतोष खताळ, नगरसेविका भारती माळी आदींची उपस्थित होती़ शहरातील काही भागात ४ ते ५ दिवसाआड तर कुठे ८ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे़ धुळेकर नागरीकांना किमान ३ दिवसाआड पाणी मिळायला हवे, असे नियोजन नागरीकांना अपेक्षित आहे़ मात्र, तसे होताना काही दिसत नाही़ उलट सोईनुसार पाणी वितरीत केले जाते़ नागरीकांकडून विचारणा झाल्यास पाईपलाईनचे काम सुरु असल्याचे ठोकळेबाज उत्तर देवून हात वरती करण्याचा प्रयत्न होतो़ पाणी सोडण्याची एक निश्चित वेळ आणि आठ दिवसाआड पाणीपुरवठा ऐवजी ३ ते ४ दिवसाआड नागरीकांना पिण्याचे पाणी मिळाल्यास व्यक्त होणारी नाराजी काहीअंशी कमी होण्यास मदत होणार आहे़ मात्र, तसे काही होताना दिसत नाही़ पाणी सोडण्याची वेळ पाळली जात नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे़  महापालिकेत सध्या भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे़ एकहाती असल्यामुळे कोणत्याही कामांचे व्यवस्थित नियोजन आणि त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे़ मात्र, पाणी वितरणाचे नियोजन नसल्यामुळे तातडीची बैठक घेण्याची वेळ आल्याचे दिसून आले़ हद्दवाढ झाल्यामुळे त्या गावांकडे देखील लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या़ अवैध नळधारकांवर गुन्हे नोंदवा : आयुक्तमहापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख पाणी प्रश्नाच्या बैठकीत पाणीपुरवठ्याच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांवर चांगलेच बरसले़ कामात कुचराई केली तर दंडात्मक कारवाई केली जाईल़ पाणी वितरणाचे बिघडलेले वेळापत्रक ताबडतोब दुरुस्त करा़ अवैध नळ कनेक्शन धारकांवर तात्काळ गुन्हे नोंदविण्यात यावे़ यात मी असो वा महापौर किंवा कोणीही असल्यास कोणालाच सूट देता कामा नये़ कोणावरही दया-माया दाखविता कामा नये़ असा सक्त सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या़ बंद खोलीत गुफ्त गू़महापौर चंद्रकांत सोनार यांच्या दालनात मोजक्याच पदाधिकाºयांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली़ सुरुवातीला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बसण्यास मुभा होती़ मात्र, पाणी वितरणाबाबतचा गलथानपणा चव्हाट्यावर येताच माध्यम प्रतिनिधींना आयुक्तांकडून बैठकीस बसण्यास मज्जाव करण्यात आला़ 

टॅग्स :Dhuleधुळे