शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या काही तासात मनमाड येथून दोघांना उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 11:29 IST

धुळे शहर पोलीस : दरोडेखोरांपैकी एक फरार, पहाटेचा थरार

ठळक मुद्देमनमाड येथून पहाटे ४ वाजून ५ मिनीटांनी दरोडेखोरांना पकडलेदोन जण ताब्यात़ मात्र एक जण घटनास्थळावरुन फरार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मालेगाव रोडवरील न्यू प्रतिक डेअरीमध्ये गुरुवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास गोळीबार करत लुट केल्याची घटना घडली़ त्यानंतर संशयित तिघे दुचाकीने पळून गेल्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासात दोघांना पकडले़ त्यातील एक मात्र पोलिसांना तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला़ ही घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजून ५ मिनीटांनी मनमाड येथे घडली़ मालेगाव रोडवरील न्यू प्रतिक डेअरीत बंदुकीचा धाक दाखवत गल्यातील १० ते १५ हजार रुपये लूटून नेण्यात आले़ त्यांच्या मागावर आलेल्यांना पाहून एकाने पिस्तूलमधून गोळी झाडली़ ती गोळी काऊंटरला लागून काच फुटल्याने नुकसान झाले़ माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडेखोरांचा शोध सुरु झाला़ पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, कबीर शेख, दिनेश परदेशी, बापू वाघ, पंकज खैरमोडे, मुक्तार मन्सुरी आणि गणेश यांचे पथक नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे दरोडेखोरांचा तपास करत दाखल झाले़ मनमाड येथील भगतसिंग मैदानात शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गोळीबार झाला़ धुळे येथून दूध डेअरीत दरोडा टाकून फरार झालेल्या दरोडेखोरांमध्ये चोरीचा माल वाटणीवरुन वाद झाला़ दोघांनी त्यांचा जोडीदार गुरु भालेराव याच्यावर गोळी झाडली़ त्याचवेळेस या दरोडेखोरांच्या मागावर असलेले धुळे पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले़ त्यांनी तात्काळ त्या तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील गुरु भालेराव आणि सागर मरसाळे यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले़ मात्र, पोलीस पथकाला तुरी देवून एक जण फरार झाला़ ही कारवाई शुक्रवारी पहाटे ४ वाजून ५ मिनीटांनी झाली़ जखमी गुरु भालेराव याच्यावर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत़

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस