धुळे : आगामी काळात येणारे बकरी ईदसह सर्व सण शांततेत साजरे करावेत. शांततेचा भंग करून कायदा हाती घेणाºयांविरूद्ध कारवाई केली जाईल असा इशारा चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांनी दिला.बकरी ईदच्या पार्श्वभूमिवर संगीता राऊत यांच्या उपस्थितीत चाळीसगाव पोलीस स्टेशन व अलहेरा हायस्कुल, जामदा मळा धुळे येथे समाजबांधवांची सभा घेण्यात आली. त्यावेळी राऊत बोलत होत्या. चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत बोलतांना संगीता राऊत म्हणाल्या, सण शांततेत साजरे करावेत.कायदा, सुव्यवस्थेला आव्हान देणाºयांची नावे कळवावीत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. यावेळी मौलवी शकील, फारूख अशरफी, कुरेशी समाजबांधव, युसूफ मुल्ला, फिरोजलाला, नगरसेवक अमीन पटेल, वसीम मंत्री, उपनिरीक्षक सागर आहेर, कॉन्स्टेबल चेतन झोळेकर, अविनाश पाटील, मुक्तार शहा आदी उपस्थित होते.याच विषयासंदर्भात सायंकाळी अलहेरा हायस्कुलमध्ये बैठक झाली. यावेळी राऊत यांनी मार्गदर्शन केले. सभेला नगरसेवक हिना पठाण, आमीर पठाण, असलम पठाण, अजीजभाई बशीर भाई, गफ्फार शहा, यांच्यासह परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.
कायदा हातात घेतल्यास कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:37 IST