जिल्ह्यातील सोळा लाख संशयितांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 01:23 PM2020-07-12T13:23:38+5:302020-07-12T13:24:28+5:30

कोरोना विषाणूवर अद्याप कोणत्या प्रकारची लस उपलब्ध झालेली नाही़

Investigation of 16 lakh suspects in the district | जिल्ह्यातील सोळा लाख संशयितांची तपासणी

dhule

Next

चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोना विषाणूवर अद्याप कोणत्या प्रकारची लस उपलब्ध झालेली नाही़ त्यामुळे प्रत्येकांने आपला व आपल्या परिवाराचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे़ जिल्हा आरोग्य विभागांतर्गत प्रत्येक गावोगावी आशा सेविकांमार्फेत रुग्णांची तपासणी केली जात आहे़ आतापर्यंत सोळा लाखांपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी पूर्ण झाली आहे़ त्यापैकी दोन लाख रुग्णांचे स्वॅब घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे़ कोरोना संकटाच्या काळात आरोग्य विभागाकडून नागरिकांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे़ तरी नागरिकांची योेग्य ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिवचंद्र सांगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
प्रश्न : कोरोना आजाराची जनजागृती ग्रामीण भागात कशी केली जाते?
उत्तर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती काही महिन्यांपासून सुरू आहे़ त्यासाठी डॉक्टर, आशा सेविका यांच्या मदतीने गावात दवंडी, होर्डिंग्ज, बॅनर, गावोगावी सभा घेऊन कोरोना विषाणूची लागण व उपाय यासंदर्भात माहिती दिली जात आहे़
प्रश्न : जिल्ह्यात आतापर्यंत किती साथरोग कक्ष स्थापन झाले आहेत?
उत्तर : जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ सदरील कक्षात कार्यरत अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील क्वारंटाईन असलेले संशयित रुग्णांची दैनंदिनी दूरध्वनीद्वारे विचारणा करून त्यांच्या आरोग्याच्या सद्य:स्थितीबाबत दिवसातून दोनवेळा माहिती घेतात़
प्रश्न : संशयित रुग्णांची तपासणी कशा पध्दतीने होते?
उत्तर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत डॉक्टर्स, नर्स तसेच आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेतली जात आहे़ याबाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती तातडीने प्रशासनाकडे पाठविली जाते़ सर्वेक्षणात सर्दी, सततचा खोकला, प्रमाणापेक्षा जास्त ताप व अन्य लक्षणे आढळून येणाऱ्या त्या व्यक्तीचे स्वॅॅब तपासणीसाठी पाठविले जातात़ रुग्ण तपासणी व नियोजनासाठी जिल्ह्यात १८ कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे़ त्यातुन रुग्णांची दररोज तपासणी होते़
शहरात विनाकारण फिरणे टाळावे
कोरोनावर सध्या औषधी उपलब्ध नाही, त्यामुळे काळजी घेणे एकमेव उपाय आहे़त्यासाठी प्रत्येकाने आपला जीव कसा वाचविता येईल याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे़ शहरात लॉकडाऊन असतानाही नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत फिरतात़ बाहेर विनाकारण फिरणे म्हणजे तुम्हीच या आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे़
भीती बाळगू नका; पण खबरदारी घ्या
जिल्ह्यात कोरोनाबाबत जनजागृती व नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जात आहे़ तरीही समाजात समज-गैरसमज मोठ्या प्रमाणात आहे़ सर्दी किंवा खोकला जरी झाला तरी घाबरून डॉक्टरांकडे येतात़ मात्र घाबरून जाऊ नका, पण खबरदारी देखील घेण्याची गरज आहे़ पावसाळ्यात साथीचे आजाराची लागण पटकन होते़ मात्र शंभरपेक्षा अधिक ताप, सर्दी, सतत खोकला, श्वास घेण्याचा त्रास तसेच संशयित व्यक्तीशी संपर्क आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्याही डॉ, सांगळे यांनी दिला़

Web Title: Investigation of 16 lakh suspects in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे