धुळे : शिंदखेडा तालुक्यातील शिराळे येथे एका हॉटेलात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात नरडाणा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात यश आले आहे़राजेंद्र सुदाम संदानशिव (२१) आणि आकाश भिकन भिल (१९) अशी या दोन संशयितांची नावे आहेत़ दोघे वर्षी ता़ शिंदखेडा येथील रहिवासी आहेत़शिराळे गावाच्या शिवारात मुंबई-आग्रा महामार्गाच्या लगत चहा आणि नाश्त्याचे हॉटेल आहे़ परंतु लॉकडाउनमुळे हे हॉटेल सध्या बंद आहे़ याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी पाच जूनला रात्री हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ हॉटेलातील फ्रीज, प्लॅस्टीकच्या आट खुर्च्या, गॅस शेगडी, पाण्याची इलेक्ट्रीक मोटार, टीकव, रसवंती यंत्राचे सुटे भाग, इतर किरकोळ साहित्य आणि गंगाजळीतील काही रोख रक्कम असा एकूण २१ हजार तीनशे रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला़याप्रकरणी हॉटेलचे मालक संजय रामदास पाटील रा़ शिराळे यांच्या फिर्यादीवरुन नरडाणा पोलीस ठाण्यात आठ जूनला भादंवी कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ, उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपूर अनिल माने, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल आत्माराम माळी, पोलीस नाईक भिमराव बोरसे यांनी तपासाची चक्रे फिरवून सखोल तपास केला़ त्यावेळी त्यांना चोरांचा सुगावा लागला़ नरडाणा पोलिसांनी वर्षी येथील दोघा संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे़ त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे़
दोन दिवसात चोरीचा तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 21:37 IST