शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणे दिसताच तपासणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST

मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी अनेकजण उशिराने रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच ...

मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी अनेकजण उशिराने रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. कोरोना विषाणूच्या चाचणीच्या सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. तपासणीचा अहवाल येईपर्यंत गृह विलगीकरणातच राहावे.

धुळे जिल्ह्यात हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, जवाहर मेडिकल फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयासह ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर आणि ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महानगरपालिकेच्या सहकार्याने २४ तास सुरू राहील, असा कोविड कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथे ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच शासकीय किंवा खासगी कोविड रुग्णालयात दाखल व्हावे. यामुळे वेळेत उपचार होऊन पुढील धोका टळू शकेल. याशिवाय कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यू थांबविता येतील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावा, शारीरिक अंतर ठेवावे आणि हात वेळोवेळी साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.