यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक उपस्थित होते. पोलीस मुख्यालयात बी. जी. शेखर आल्यानंतर त्यांचे स्वागत चिन्मय पंडित, प्रशांत बच्छाव यांनी पुष्पगुच्छ देवून केले. यानंतर पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. पोलीस मुख्यालयाची त्यांनी सविस्तर पाहणी केली. आवश्यक त्या सूचनाही केल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधीक्षक पंडित यांच्या दालनाला त्यांनी भेट दिली. त्यांच्याशी चर्चा केली. चिंतन सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत गुन्ह्यांचा आढावाही घेतला. आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बैठकीनंतर त्यांनी विविध विभागांना भेटीही दिल्या.
डीआयजी शेखर यांच्याकडून पोलीस मुख्यालयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST