लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : येथे जलयुक्त शिवार योजनाअंतर्गत दुधई नाल्यावरील बंधाºयाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच पावसात हा बंधारा फुटल्याने जलमुक्त झाला आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने या बंधारा कामाची पहाणी केली.धुळे जिल्हाधिकारी कार्यालय व लघु सिंचन विभागाने या घटनेची दखल घेत २३ रोजी दुपारी कापडणे येथे भेट देऊन दुधई नाल्यावरील फुटलेल्या बंधाºयाच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, धुळे पंचायत समिती लघु सिंचन विभागातील कनिष्ठ अभियंता के.डी. देवरे यांच्यासह चार ते पाच अधिकाºयांच्या पथकाने घटनास्थळी येऊन बंधाºयाची पाहणी केली. बंधाºयाची खोली, लांबी-रुंदीचे मोजमाप केले. सदर काम ईस्टीमेट प्रमाणे झाली आहे किंवा नाही, याची शहानिशा केली. बंधारा फुटला असल्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या शेती वाहून मोठे नुकसान झालेले आहे. यात शेतकरी निळकंठ गंगाराम पाटील, विजय आत्माराम पाटील, बंटी पाटील, रविंद्र देवीदास पाटील, सुरेश कौतिक पाटील आदी शेतकºयांचे नुकसान झाले असून संबंधित बंधाºयाचे निकृष्ट काम झाल्याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याचवेळी दखल न घेतल्यामुळे शेवटी बंधारा फुटल्याचे शेतकºयांनी सांगितले. संबंधित अधिकाºयांनी यासंदर्भात शेतकºयांकडून सविस्तर माहिती लेखी जबाबात घेऊन स्वाक्षºया घेतल्या आहेत.दरम्यान, यासंदर्भातील चौकशी अहवाल, शेतकºयांकडून घेतलेले जाबजबाब जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकाºयांवर कारवाई होण्याची शक्यता पथकातील अधिकाºयांनी व्यक्त केली.
‘जलमुक्त’ बंधारा कामाची प्रशासनाकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:49 IST