शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

ऑनलाईनमुळे वाढले डोळ्यांचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:24 IST

धुळे : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखणे आवश्यक असल्याने शाळा-महाविद्यालये ठप्प झाली़ होती. पर्यायाने विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाकडे वळले़ ...

धुळे : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखणे आवश्यक असल्याने शाळा-महाविद्यालये ठप्प झाली़ होती. पर्यायाने विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाकडे वळले़ मात्र आता ऑनलाईन शिक्षणाचेही गंभीर परिणाम समोर येवू लागले आहेत़. ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक मुलांमध्ये डोळ्यांचे आजार वाढले असून पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. या शिक्षण पध्दतीमुळे मुले एकलकोंडे होत असून मानदुखी, पाठदुखीसह डोळ्यांच्याही तक्रारी वाढल्या असल्याने आता पालकांचीही चिंता वाढली आहे़.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉम्प्युटर, पॅड, टँबलेट, स्मार्ट फोन आदींच्या माध्यमातून मुले ऑनलाईन शिक्षणाकडे वळली आहेत. आधुनिक साधने हाताळण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या पध्दतीमुळे प्राप्त झाले असले आणि या ज्ञानाचा हे विद्यार्थी वैयक्तिक जीवनातही वापर करू लागले असले तरी ५ ते ६ तास पुस्तक वाचल्यानंतर जेवढा डोळ्यावर ताण येतो, तेवढाच ताण एक तास मोबाईल पाहण्याने येतो असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे़. याचा प्रत्यय आता येवू लागला आहे़. बालरोग तज्ञांकडे येणाऱ्या मानदुखी, पाठदुखीबरोबरच डोळ्यांच्या विविध विकारांच्या बालरुग्णांमधे वाढ झाली आहे. डोळे दुखणे, थकवा, चिडचिड अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी असल्याचे सांगण्यात आले़. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नसेल तर किमान त्याचा वर्ग २० मिनिटांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता पालकांनी घ्यायला हवी.ऑनलाईन शिक्षणामुळे मानदुखी, पाठदुखीबरोबरच डोळ्यासंबंधीच्या तक्रारी वाढल्या आहेत़ एवढेच नव्हे तर या शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होत असून स्मरणशक्तीही कमी होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे़ याबरोबरच मुले एकलकोंडी तसेच रागीट होत असून चिडचिडेपणा वाढत आहे.