शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

धुळ्यात जमिनीचा वाढीव मोबदला हडपण्याचा डाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 22:11 IST

जमीनकांड प्रकरण : वाढीव मोबदला मिळाला पावणेतीन कोटी रुपये, जिल्हा प्रशासनाची माहिती  

ठळक मुद्देवाढीव मोबदल्याची रक्कम पावणेतीन कोटी रूपये मनपाच्या रेकॉर्डवर सतीष महाले अद्याप राष्टÑवादीचे नगरसेवक राष्टÑवादीचे विनायक शिंदेंचे अद्याप मोहाडी येथे राजकीय वर्चस्व 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चौपदरीकरणात पिंपरी शिवारात उभारण्यात येणाºया उड्डाणपुलासाठी संपादित जमिनीच्या मोबदला रकमेतील अपहारप्रकरणी अमळनेर पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल झाला. ज्या जमिनीचा हा मोबदला होता तिचे क्षेत्रफळ ६ हजार ६०० चौ.मी. एवढे असून तिचा वाढीव मोबदला म्हणून तब्बल २ कोटी ९५ लाख ६९ हजार ५७२ रुपये मंजूर झाला होता, अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. या रकमेतून टीडीएस कापून प्रत्यक्ष २ कोटी ७९ लाख ७८ हजार २६२ रुपये या प्रकरणातील तक्रारदार दिनेश भिल याच्या नावावर जमा झाले होते. ही सर्व रक्कम हडपण्याचा संशयितांचा डाव होता, असे तक्रारीमुळे स्पष्ट होत आहे. पिंपरी शिवारातील या जमिनीचा गट क्र. २/३ हा असून तिचे एकूण क्षेत्रफळ ६ हजार ६०० चौरस मीटर एवढे आहे. शेतीच्या प्रचलित परिमाणात दीड एकर व वर काही गुंठे एवढी ही जमीन आहे. ही जमीन संपादित झाल्यानंतर १६ मे २०१३ रोजी या जमिनीचा मूळ मोबदला म्हणून  विकास कन्हेरसिंग भिल यांना १४ लाख रुपये मिळाले होते. त्यांनी तत्पूर्वीच ही जमीन धुडकू मोरे यांना २६ लाख रुपयांना विकली होती.  यानंतर त्यांचे निधन झाल्याने जमीन त्यांचा वारसदार दिनेश भिल यांच्या नावे झाल्याचे सूत्रांनी सांगितले.   संशयितानी महामार्गासाठी संपादित या जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी केलेल्या प्रकरणावर तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यांनी दिलेल्या दराच्या निर्णयानुसार वाढीव मोबदल्यासाठी निवाडा (अ‍ॅवार्ड) तयार करून तो ४ डिसेंबर २०१७ रोजी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यास प्राधिकरणाकडून २ कोटी ९५ लाख ६९ हजार ५७२ रुपये वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला होता. टीडीएस वजा करून प्रत्यक्षात दिनेश भिल यास २ कोटी ७९ लाख ७८ हजार रुपये वाढीव मोबदल्याच्या स्वरूपात मिळाले. त्यांच्यात करार झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दिनेश भिल यांनीच तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी या दोन्ही राजकीय दिग्गजांसह इतर संशयितांविरुद्ध विविध कलमांन्वये  गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी जिल्ह्यात व्यापक चर्चा होत आहे. मनपाच्या रेकॉर्डवर महाले अद्याप राष्टÑवादीचे नगरसेवक सतीश महाले हे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक असून त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. ते सध्या शिवसेनेचे महानगर प्रमुखही आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी पक्षबदल करून राष्टÑवादी कॉँग्रेसमधून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. मात्र ते अद्याप मनपाच्या रेकॉर्डवर राष्टÑवादीचे नगरसेवक आहेत. राष्टÑवादी कॉँग्रेसने त्यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही. शिवसेना पक्षाने त्यांच्यावर महानगर प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. मोहाडी परिसरात शिंदेचे राजकीय वर्चस्व अबाधित विनायक शिंदे हे राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून जिल्ह्यात शिंदे यांची ओळख आहे. त्यांनी या आधी राज्य विधानसभेच्या निवडणुकीत धुळे मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढत दिली. त्यात ते पराभूत झाले होते. ते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. मोहाडीत त्यांचे राजकीय वर्चस्व असून ते किंवा त्यांनी उभा केलेला उमेदवारच तेथे निवडून येतो. राजकारणात ते सतीश महाले यांचे कट्टर विरोधक मानले जात असले तरी वाढीव मोबदला अपहार प्रकरणात ते त्यांच्यासोबत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘फेसबुक’वरील लाईव्ह प्रतिक्रिया अंगाशी! शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीष महाले यांनी आपल्याबद्दल पसरलेल्या अफवेबाबत ‘फेसबुक’वर लाईव्ह प्रतिक्रिया दिली. ती सोशल मीडियाद्वारे शहरात सर्वत्र ‘व्हायरल’ होऊन त्यांच्या विरोधकांपर्यंतही पोहचली. त्यामुळे त्यांना आयतेच कोलीत मिळाले. त्यांच्या विरोधकांनी हे फेसबुक लाईव्ह थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवले. आणि मग तेथूनच पुढील सर्व सूत्रे हालली, अशी सर्वत्र चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या संदेशानंतर मग महाले व शिंदे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली. एकूण विरोधकांनी बरोबर वेळ साधली, असेही बोलले जात आहे.भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शी स्वरूपात राबविण्यात आलेली आहे. वाढीव मोबदल्याच्या प्रकरणांवर गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी दिलेल्या वाढीव दरानुसार विभागातर्फे निवाडे करून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणास पाठविले होते, अशी प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रवींद्र भारदे यांनी दिली. 

 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा