पेसा क्षेत्रात गावांचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:41 PM2019-04-16T12:41:28+5:302019-04-16T12:41:47+5:30

ग्रामस्थांची मागणी : जिल्हा प्रशासना निवेदन 

Include villages in Pessa area | पेसा क्षेत्रात गावांचा समावेश करा

dhule

googlenewsNext


धुळे : साक्री तालुक्यातील काही आदिवासी गावांचा पेसा क्षेत्रात समावेश आलेला आहे़ तर उर्वरित गावांचा देखील पेसा क्षेत्रात समावेश करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सोमवारी देण्यात आले़
साक्री तालुक्यातील सुकापूर, होळयाचा पाडा, वडपाडा, गांगुर्डेपाडा, गव्हाणीपाडा, केवडीपाडा, मांड वीपाडा, म्हाळ्याचापाडा, हारपाडा, खामपाडा, सांडेर, आबुटबारा, गढीपाडा गावे शासकीय नियमानुसार पेसा अंतर्गत आहेत़ मात्र शासनस्तरावर चुकीचा अहवाल पाठविण्यात आल्याने या गावांचा पेसा क्षेत्रात समावेश करण्यात आलेला नाही़ वरील गावे शंभर टक्के आदिवासी गावे आहेत़  विद्यार्थ्याना शैक्षणिक नुकसान व नोकरीसाठी अडचणीला सामोरे जावे लागते़ याबाबत लोकप्रतिनिधीकडून दखल घेण्यात आलेली नाही़ तरी वरील गावांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी राजेश ठाकरे, अमोल ठाकरे, विनोद गावीत, अमोल अहिरे, नितीन चौधरी, बाळु ठाकरे, नितीन गांर्गर्डे आदीसह ग्रामस्थांनी केली आहे़ 

Web Title: Include villages in Pessa area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे