धुळे : शहरातील नवरंग जलकुंभाच्या ठिकाणी प्लॉस्टिक संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे़ या केंद्राचे उदघाटन मंगळवारी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़ मधुकर पवार यांच्या हस्ते करण्यात आले़शहरात स्वच्छता हीच सेवा कार्यक्रमातून शहरात विविध ठिकाणी जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे़ मोहिमेव्दारे स्वच्छता, प्लॉस्टिक बंदी, मतदान जनजागृती करण्यात येत आहे़या अभियानाचाच एक भाग म्हणून आता शहरातील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात येणार आहे. त्यात नवरंग जलकुंभाच्या ठिकाणी हे संकलन केंद्र सुरु केले. तसेच अन्य तीन ठिकाणी केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आले़
प्लॉस्टिक संकलन केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:14 IST