धुळे : धमाणे गटातील तावखेडा प्र.न. येथे पाणी पुरवठा योजनेअंतर्गत तापी नदी पात्रातून पाणी शुध्दीकरण न करता साचलेल्या पाण्यातून अशुद्ध पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची प्रकृती खराब होत असून घसा दुखण्याच्या तक्रारी वाढत आहेत़ सध्या कोरोना या विषाणूमुळे जनता भयभीत झाली आहे. अश्या परिस्थितीत त्यांना तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी धमाणे गटातील जिल्हा परिषद सदस्या सुनिता शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे़धमाणे ते लोहगाव रस्ता ग्रामसडक योजनेतून झालेला आहे. त्याचे काम अतिशय निक्रुष्ट पध्दतीने झालेले आहे़ हे काम पुर्ण करण्यात २ वर्ष लागले त्यात साईट पट्ट्या देखील भरलेल्या नाहीत व यात ७०० ते ८०० मिटर काम अपुर्ण आहे़ या संदर्भात गावकºयांनी तक्रारही केलेली आहे़ या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते़ रस्त्याची दुरुस्ती ठेकेदार करीत नाही तोपर्यंत ठेकेदाराला अनामत रक्कम देवू नये अशीही मागणी त्यांनी केली़सर्व गटात जे काम मंजूर केलेले असेल ते रद्द करण्यात यावे आणि तो निधी देशात सुरु असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसाठी खर्च करायला हवा़ सध्या त्याची गरज असल्याची भूमिका सुनिता सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे व्यक्त केली आहे़माझ्या गटात या अगोदर विकासाची कामे मिळण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे़ मात्र, माझ्या गटात कुठलेच काम दिले गेलेले नाही़ इतर ठिकाणी मात्र कामे मंजूर केली गेली आहेत़ माझा गट आदिवासी राखीव आहे़ म्हणून दिले गेलेले नाही का, असा सवालही उपस्थित करण्यात आलेला आहे़
तावखेड्यात होतोय अशुध्द पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:34 IST