देवपूर परिसरात आकाशवाणी टॉवर शेजारी असलेल्या दिगंबर पाडवी गृहनिर्माण सहकारी सोसायटीत कायमस्वरूपी स्वमालकीची घरे असलेले रहिवासी भागात थ्री फेज विजेचा वापर करून मागील दोन महिन्यांपासून कारखाना सुरू आहे. महावितरण कंपनीकडून कोणत्या निकषांवर या भागात अवजड लोखंडी मशनरीच्या वापरासाठी वीज उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. विजेचा अतिभार होत असल्याने वीज पुरवठा कमी-जास्त होतो. महावितरण कंपनीकडून तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर प्रकाश पाटील, इमरान पिंजारी, सैनुद्दीन पिंजारी, मयूर चौधरी, यशवंत बडगुजर, दगडू देवरे, जगदीश चौधरी, दीपक बारी, कौतिक पाडवी, चारूशीला देसले, रूपसिंग गिरासे, उषा गावित, सैनाज पिंजारी, शकील पिंजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लोखंडी मशनरी कारखान्यावर तात्काळ कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:23 IST