शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जलवाहिनीसाठी महामार्गाचे खोदकाम!

By admin | Updated: February 25, 2017 23:51 IST

धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटींच्या पाणी योजनेत प्रस्तावित जलवाहिनीसाठी महामार्ग ओलांडून जलवाहिनी टाकावी लागणार आहे़

धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटींच्या पाणी योजनेत प्रस्तावित जलवाहिनीसाठी महामार्ग ओलांडून जलवाहिनी टाकावी लागणार आहे़ त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गाचे खोदकाम करावे लागणार असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्याबाबत परवानगीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास (एनएचएआय) पत्र दिले आहे़ तसेच त्याबाबत अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मजीप्रा सूत्रांनी दिली़धुळे महापालिकेतर्फे राबविण्यात येणारी १३६ कोटी रुपयांची पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आली असल्याने मजीप्राकडून योजनेचे काम सुरू आहे़ मजीप्रातर्फे सध्या सहा जलकुंभांची कामे सुरू असून त्यात नगावबारी येथे प्रस्तावित एमबीआर, मोहाडी, मनपा शाळा क्रमांक २८, शांतीनाथनगर व तुळशीरामनगर जलकुंभांचा समावेश आहे़ तर क्षिरे कॉलनीत प्रस्तावित जलकुंभासाठी अद्याप मनपा प्रशासनाकडून जागा देण्यात आलेली नाही़ मजीप्राकडून आतापर्यंत ५० किलोमीटरपेक्षा अधिक जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत़ योजनेत एकूण ३४८ कि.मी. जलवाहिन्या प्रस्तावित आहेत़पुन्हा हायड्रोलिक टेस्टिंग़़महापालिकेतर्फे सदरची योजना राबविली जात असताना योजनेत वापरल्या जात असलेल्या साहित्यावर आक्षेप नोंदविण्यात आला होता़ त्यामुळे मनपाने जलवाहिन्यांसाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे हायड्रोलिक टेस्टिंग केले होते, मात्र त्यावरूनदेखील वाद उद्भवला होता़ योजनेत वापरण्यात आलेल्या साहित्यावर आक्षेप असतानाही मजीप्राकडून उप जलवाहिन्यांसाठी तेच पाईप वापरले जात आहेत़ सदर पाईपचा दर्जा समाधानकारक असल्याचे यापूर्वी तीन वेळा स्पष्ट झाले आहे, तरीही पुन्हा एकदा जलवाहिन्यांचे हायड्रोलिक टेस्टिंग केले जाणार असल्याचे मजीप्राने स्पष्ट केले व साहित्यात बदल करावयाचे असल्यास मनपाने तसे स्पष्ट करायला हवे, असे मजीप्राने स्पष्ट केले़ दुसºया टप्प्यातील कामाच्या चौकशीची मागणी नुकत्याच झालेल्या महासभेत झाली आहे़ ४८ कि.मी. जलवाहिन्यांचा शोध!महापालिका योजना राबवित असताना कोणताही आराखडा तयार न करता जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या़ महापालिकेने टाकलेल्या ४६ कि.मी. जलवाहिन्यांची नोंद मोजमाप पुस्तिकेत (एमबी रेकॉर्ड) करण्यात आली़ मात्र त्यानंतर झालेल्या वादविवादांमुळे जवळपास ४८ कि.मी. जलवाहिन्यांची नोंद मोजमाप पुस्तिकेत नव्हती, त्यामुळे मजीप्राने आतापर्यंत ४८ कि.मी. जलवाहिन्या शोधून त्यांची नोंद मोजमाप पुस्तिकेत केली आहे़ कारवाईचे आश्वासन१३६ कोटींच्या पाणी योजनेची चौकशी मजीप्रा गुणवत्ता परीक्षण समितीच्या अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे यांनी केली होती़ त्यानंतर पलांडे यांनी सादर केलेल्या अहवालावर अद्याप कार्यवाही न झाल्याने नुकत्याच झालेल्या महासभेत प्रशासनाला त्याबाबत जाब विचारण्यात आला होता़ त्यामुळे मनपा प्रशासनाकडून त्याबाबत महासभेच्या ठरावानुसार कार्यवाही होऊ शकते़ दरम्यान, योजनेच्या दुसºया टप्प्यातील कामाच्या चौकशीची मागणीही झाली आहे़निधीची मागणीपाणी योजनेच्या दुसºया टप्प्यातील निधीच्या मागणीचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने यापूर्वीच शासनाला सादर केला आहे़ मात्र योजनेत सुरू असलेल्या कामाची पाहणी झाल्यानंतर निधी मिळणार आहे़