धुळे - जिल्ह्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक ५९२ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी एका दिवसात सर्वाधिक ५५० अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आता मात्र रुग्णसंख्येने नवा विक्रम केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येने २४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्या २४ हजार ४९० इतकी झाली आहे. त्यापैकी १९ हजार ६४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, साक्री, दोंडाईचा व शिरपूर येथील रुग्णांचा समावेश आहे. साक्री तालुक्यातील बोधगव येथील ६८ वर्षीय महिला व दोंडाईचा येथील ४० वर्षीय पुरुषाचा भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पुंडलिक नगर शिरपूर येथील ७२ वर्षीय पुरुषाचा शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात, धुळे शहरातील १८४ तर ग्रामीण भागातील २३१ रुग्णांचा समावेश आहे. शनिवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ४३४ अहवालांपैकी ११६ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, दिपमाला सोसायटी १,
गोंदूर रोड १, शिवप्रताप कॉलनी १, आर्य नगर १, भीमनगर १, अशोक नगर १, ओसवाल नगर १, देवमोगरा कॉलनी २, टागोर कॉलनी १, भाईजी नगर १, कृषी कॉलनी २, सदिच्छा नगर १, सद्गुरू कॉलनी १, श्रीकृष्ण कॉलनी १, सुंदर नगर १ यांचा समावेश आहे. धुळे शहरातील सर्वच भागात रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे.