आरोग्य सेविका आशा शिंदे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:37 IST2021-09-03T04:37:39+5:302021-09-03T04:37:39+5:30

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोराडी ग्राम परिषदेच्या सरपंच सुरेखाबाई पावरा होते. याप्रसंगी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा बोराडी ग्राम ...

Health worker Asha Shinde felicitated | आरोग्य सेविका आशा शिंदे यांचा सत्कार

आरोग्य सेविका आशा शिंदे यांचा सत्कार

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोराडी ग्राम परिषदेच्या सरपंच सुरेखाबाई पावरा होते. याप्रसंगी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा बोराडी ग्राम परिषदेचे उपसरपंच राहुल रंधे, जिल्हा परिषद सदस्य जताबाई पावरा, ग्रामविकास अधिकारी डी.आर. पेंढारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रमण पावरा, पंतसंस्थेचे चेअरमन शंशाक रंधे, पोलीस पाटील अनिल पावरा, वसंत पावरा, हरी पावरा, भागवत पवार व ग्राम परिषदेचे सदस्य संजय पाटील, चंद्रसिंग पवार, सुखदेव भील, जिजाबराव पाटील, अर्जुन भील, विजय सत्तेचा, डोंगरसिंग पावरा, मनूबाई भिल, कंचनबाई पावरा, भावना पाटील, छायाबाई बडगुजर, उज्जैनबाई भील, उर्मिलाबाई पावरा, प्रमिलाबाई पावरा, रेखाबाई पाटील, लिपिक उमेश पावरा, संगणक सहायक राकेश पावरा, विजय पावरा, भुऱ्या पावरा आदी उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका आशा शिंदे यांनी सहा वर्षांत आदिवासी भागात चांगले काम केले. कोरोना काळात जिवाची पर्वा न करता रुग्णसेवेला प्राधान्य दिले. त्यांची गेल्या महिन्यात आशा शिंदे यांची वाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली झाली आहे. त्यामुळे त्यांना बोराडी ग्राम परिषदेच्या वतीने सत्कार करून गौरविण्यात आले.

Web Title: Health worker Asha Shinde felicitated