भूषण चिंचोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील १२३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतलेल्या गंभीर व्याधी असलेल्या ४० रूग्णांनीही कोरोनावर मात केली आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मुत्रपिंडाचे विकार, दमा, लकवा आदि आजार असलेले रूग्ण देखील कोरोनावर मात करून रूग्णालयातून घरी परतले आहेत. तसेच ५५ वर्षावरील २१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.धुळे शहरातील ८१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर धुळे तालुक्यातील पाच, शिरपूर तालुक्यातील २६, शिंदखेडा तालुक्यातील सात व साक्री तालुक्यातील दहा रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत २४८ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर २५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पाच रूग्णांचा उपचारां आधीच मृत्यू झाला होता तर रूग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत सहा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असतांना एक ते तीन दिवसांत पाच, तीन ते सात दिवसात सात व सात दिवसांपेक्षा जास्त दिवस उपचार घेतल्यानंतर दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे असल्याने दिलासा आहे़ डॉक्टर, नर्स, कर्मचारी उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न करीतत आहेत़रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. पाच जणांचा मृत्यू उपचारा आधीच झाला होता. तरीही प्रत्येक मृत्यूची चिकित्सा करून कारणे शोधत आहोत. त्यासाठी 'डेथ आॅडीट कमेटी' स्थापन केली आहे.- डॉ.पल्लवी सापळे, अधिष्ठाताकाही रूग्ण त्रास झाल्यानंतर घरीच प्राथमिक उपचार करतात व आजार बळावल्यानंतर रूग्णालयात दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ तपासणीसाठी आले पाहिजे.- डॉ.दिपक शेजवळ, समन्वयककोरोनामुक्त झालेले व्याधीग्रस्त रुग्ण४ अतिदक्षता विभाग ९४ व्हेंटीलेटरवरील २४ उच्च रक्तदाब ९४ह्रदयरोग ३४ क्षयरोग १४ गरोदर महिला ३४ लकवा १४ दमा १४ किडनी विकार ३४ ५५ वर्षावरील २१कोरोनामुळे १७ पुरूषांचा मृत्यूवयोगट संख्या टक्केवारी० ते १० ० ०%११ ते २० ० ०%२१ ते ३० २ ११.७६%३१ ते ४० १ ५.८८%४१ ते ५० ५ २९.४१%५१ ते ६० ५ २९.४१%६० वर्षावरील ४ २३.५%कोरोनामुळे ०८ महिलांचाही मृत्यूवयोगट संख्या टक्केवारी० ते १० ० ० %११ ते २० १ १२.५ %२१ ते ३० २ २५ %३१ ते ४० ० ० %४१ ते ५० ० ० %५१ ते ६० २ २५ %६० वर्षावरील ३ ३७.५ %
गंभीर आजाराचे ४० रुग्णही झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:54 IST