आॅनलाइन लोकमतधुळे : महामार्गावर दरोडा घालणाºया दरोडेखोरांच्या टोळीत धुळ्याचा व्यापारी असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले़ ९ महिन्यांपुर्वी घडलेल्या दरोडा प्रकरणी एलसीबीच्या पथकाने ५ दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत़ यात धुळ्यातील बेकरी व्यापारी मोहम्मद ओसामा याचाही समावेश आहे़पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, हनुमंत उगले, पोलीस कर्मचारी सुनील विंचुरकर, संदिप थोरात, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, मनोज पाटील, चेतन कंखरे, सागर शिर्के यांनी ही कारवाई केली़सोनगीर गावाच्या शिवारात खरगोनकडे जाणाºया पिकअप चालकाला एका दरोडेखोरांनी थांबविले़ प्रवासी म्हणून तो गाडीत बसला़ त्यानंतर सोनगीरपासून ३ किमी अंतरावर दुचाकीवरुन आणखी त्याचे तीन साथीदार आले़ त्यांनी पिकअप गाडीच्या पुढे दुचाकी आडवी लावली़ चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड, मोबाईल हिसकावून पोबारा केला होता़ याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला़ हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते़एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दरोडेखोरांपर्यंत पोहचले़ पोलिसांनी नईमखान जलील खान, नबील अहमद अन्सारी, सोयल शाह अलम शाह, मोबीन शाह अजगर शाह आणि मोहम्मद ओसामा अशी पकडण्यात आलेल्या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत़ त्यांच्याकडून १ लाख १२ हजाराची रोकड गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली़दरम्यान, मोहम्मद ओसामा हा धुळ्यातील बेकरी व्यापारी असून तो खरगोन येथील बेकरी चालकाकडून बेकरी माल घ्यायचा़ मोहम्मद ओसामाने रोकड असल्याची टीप त्याच्या साथीदारांना दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़
दरोडेखोरांच्या टोळीत व्यापाऱ्याचाही हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:27 IST