शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

कारमधून मालेगावकडे जाणारा अडीच लाखांचा गुटखा जप्त

By देवेंद्र पाठक | Updated: July 25, 2023 21:57 IST

आर्वी शिवारात तालुका पोलिसांची कारवाई, दोघे अटकेत

देवेंद्र पाठक, धुळे: धुळ्याकडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या कारमधून अडीच लाखांचा गुटखा तालुका पोलिसांनी आर्वी शिवारात पकडला. अडीच लाखांच्या गुटखासह ३ लाख ९३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. कारचालक विजय भालचंद्र सोंजे (वय २६, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून पुरवठादार सनी टेकचंद पंजाबी (वय ३६, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) याचे नाव समोर येताच त्यालाही अटक करण्यात आली.

एका कारमधून गुटखा वाहून नेला जाणार असल्याची माहिती तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात साेमवारी सकाळी सापळा लावण्यात आला. कार (क्रमांक एमएच- १५, एएच- ८९६०) येताच अडविण्यात आली. चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी कारसह चालकाला ताब्यात घेतले. कारची तपासणी केली असता, त्यात गुटखा आढळून आला. पोलिसांनी कारचालक विजय भालचंद्र सोंजे (वय २६, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) याला अटक केली. गुटख्याबाबत अधिक चौकशी केली असता पुरवठादार सनी टेकचंद पंजाबी (वय ३६, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) याचे नाव समोर आले. संशयित विजय सोंजे याच्या कबुलीवरून सनी पंजाबी याला मंगळवारी पहाटे पावणेसहा वाजता अटक करण्यात आली आहे. गुटख्यासह कार असा एकूण ३ लाख ९३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील व त्यांच्या पथकातील महादेव गुट्टे, रवींद्र राजपूत, कुणाल पानपाटील, उमेश पवार, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, विशाल पाटील यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी