गुलशन उदासींसह तीन जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:41 PM2019-10-22T23:41:08+5:302019-10-22T23:41:52+5:30

कुमारनगर : व्यापाऱ्याला लूट करुन मारहाण

 Gulshan crime against three people with depression | गुलशन उदासींसह तीन जणांविरुध्द गुन्हा

dhule

googlenewsNext

धुळे : हॉकीस्टीक आणि लोखंडी पाईपने मारहाण करुन व्यापाºयाकडील रोकड आणि दागिने लुटणाºया गुलशन उदासीसह तिघांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ संशयित गुलशन उदासी हे नगरसेविका कशीश उदासी यांचे पती आहेत़
ब्लॉक नंबर ३ कुमार नगर, साक्री रोड धुळे येथे राहणाºया सुरेश नानुमल तोलाणी (५५) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कुमारनगरातील स्वामी टेऊराम शाळेसमोरील रस्त्यावर गुलशन ओमप्रकाश उदासी याने तुझा भाऊ कुठे आहे, अशी विचारणा सुरेश तोलाणी यांना केली़ त्यावर तोलाणी यांनी मला माहित नाही, असे सांगितले़ या घटनेचा राग येवून गुलशन ओमप्रकाश उदासी, कमलेश ओमप्रकाश उदासी आणि त्यांचा एक साथीदार (तिघे रा़ कुमारनगर, साक्री रोड, धुळे) यांनी सुरेश तोलाणी यांच्यावर हातातील लाकडी हॉकीस्टीक, लोखंडी पाईपने प्रहार केला़ तसेच हाताबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले़ या तिघा संशयितांनी ३ हजार रुपयांची रोकड आणि गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पलायन केले़
याप्रकरणी भादंवि कलम ३९४, ३२४, ३२३, ४५२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक तिगोटे घटनेचा तपास करीत आहेत़

Web Title:  Gulshan crime against three people with depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे