प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेशबंदी शासनाचे निर्देश : विनाकारण प्रवेश करणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:35 AM2021-04-17T04:35:50+5:302021-04-17T04:35:50+5:30

अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने व वाहन ४.० प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटार वाहन निरीक्षकाने ॲप्रूव्ह केलेले आहे, अशी ...

Government's ban on entry in Regional Transport Office: Action will be taken against those who enter without any reason | प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेशबंदी शासनाचे निर्देश : विनाकारण प्रवेश करणाऱ्यांवर होणार कारवाई

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेशबंदी शासनाचे निर्देश : विनाकारण प्रवेश करणाऱ्यांवर होणार कारवाई

Next

अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने व वाहन ४.० प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटार वाहन निरीक्षकाने ॲप्रूव्ह केलेले आहे, अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहील. वाहनविषयक कामे हस्तातरण, कर्ज बोजा नोंद घेणे, कमी करणे याबाबत वाहन ४.० प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करत असतील, अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यात येतील. नव्याने सादर कामकाज संदर्भात कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येणार नाही. वाहन ४.० प्रणालीवर ऑनलाइन पध्दतीने प्राप्त होणारी सर्व परवानाविषयक कामकाज सुरू राहील. शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती कामकाज बंद राहील. दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे, नुतनीकरण सारथी ४.० प्रणालीवर प्राप्त झालेली व पूर्तता करत असतील, अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यात येतील. नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अंमलबजावणी पथकाने रस्ता सुरक्षेशी निगडित वाहनांची तपासणी करण्यात येईल. वाहन अधिग्रहणाचे कामकाज प्राधान्याने करण्यात येईल. सार्वजनिक प्रवासी वाहनातून व खासगी प्रवासी बस मधून होणारी प्रवाशांची वाहतूक ही राज्य शासनाने जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी केलेल्या सूचनांप्रमाणे होत असल्याची खातरजमा करण्यात येईल. सीमा तपासणी नाक्यावरील कामकाम नियमितपणे चालू राहील.

अभ्यागताना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला आहे. आवश्यक कामासाठी ४८ तासांपूर्वी केलेल्या अँटिजेन चाचणीचा अहवाल सादर केल्यावर सकाळी १० ते २ या वेळेत प्रवेश दिला जाणार आहे. कार्यालयीन आवारात विनाकारण प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Government's ban on entry in Regional Transport Office: Action will be taken against those who enter without any reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.